नमस्कार !!
मित्रांनो, उद्योजकतेमध्ये व त्यासोबतच जीवनामध्ये प्रत्येक व्यक्तीला मोठ्या आव्हानांना आणि संकटांना तोंड द्यावे लागते. जीवनामध्ये संघर्ष कोणालाच चुकलेला नाही, पण काही लोक जीवनामध्ये संघर्ष करता करता खचून जातात तर काही व्यक्ती त्यावर जिद्दीने व चिकाटीने मात करून आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी नाविन्यपूर्ण काम करून जातात. तर मग त्या लोकांमध्ये काय फरक असतो आणि आपणही त्यांच्या प्रमाणे जीवन मध्ये आव्हानांना यशस्वी रित्या कश्याप्रकारे तोंड देऊ शकतो. त्यासोबतच सकारात्मक दृष्टिकोन ठेवून उद्योजकांनी आपली व्यावसायिक वाटचाल कशी करावी या बाबत झी २४ तास चे माजी संपादक आणि सुप्रसिद्ध व्यवस्थापन तज्ञ डॉ. उदय निरगुडकर यांनी आपले विचार मांडले आहेत.
🌎 Our Website: https://lakshyavedh.com/
📷 Instagram: https://www.instagram.com/lakshyavedh/
📘 Facebook: https://www.facebook.com/lakshyavedhinstitute/
📞 Call 9969204585
📱 WhatsApp: https://wa.link/vujp4k
📧 Email: [email protected]
🎯 लक्ष्यवेध इन्स्टिटयूट : अर्थपूर्ण आणि समृद्ध जीवनासाठी, महाराष्ट्रीय उद्योजकांचा दिपस्तंभ !!
लक्ष्यवेध इन्स्टिट्यूट ऑफ लिडरशीप अँड एक्सलन्स ही संस्था वैयक्तिक आणि व्यावसायिक विकास प्रशिक्षण क्षेत्रात वर्ष २००८ पासून कार्यरत आहे. आजपर्यंत सुमारे ३ लाखांहून अधिक प्रशिक्षणार्थीना लक्ष्यवेध इन्स्टिटयूटच्या विविध प्रशिक्षणक्रम आणि जाहीर कार्यक्रमांमध्ये सहभाग घेऊन आपल्या जीवनामध्ये अमुलाग्र परिवर्तन घडवून आणले आहे. लक्ष्यवेध इन्स्टिटयूट च्या विविध प्रशिक्षणक्रम, उपक्रम आणि मार्गदर्शनाचा फायदा महाराष्ट्रातील अनेक उद्योजकांना, प्रोफेशनल्स व्यक्तींना, स्वयंरोजगारकर्ते आणि विद्यार्थ्यांना झाला आहे.
📌अतुल राजोळी:
अतुल राजोळी उद्योजक, बेस्ट सेलिंग लेखक, लीडरशिप कोच, महाराष्ट्रातील आघाडीचे जीवन व व्यवसाय स्ट्रॅटेजिस्ट आहेत. वैयक्तिक आणि व्यावसायिक प्रशिक्षण क्षेत्रातील अग्रगण्य संस्था, लक्ष्यवेध इन्स्टिट्यूटचे ते संस्थापक आहेत. संघटनात्मक नेतृत्व, व्यवसाय धोरण आणि वैयक्तिक उत्कृष्टता या क्षेत्रातील नामांकित व्यक्ती. ते वर्ष २००८ पासुन महाराष्ट्रभरातील हजारो उद्योजकांसाठी कोच आणि ट्रेनर म्हणून कार्य करत आहेत.
#atulrajoli #lakshyavedh #marathiudyojak #motivation #marathibusiness #marathientrepreneurs #business #miudyojak #marathimotivation