MENU

Fun & Interesting

२००वर्षांची मातीची घरे जपणारे "Eco Village"|Sustainable Village in Sindhudurg

Konkani Ranmanus 76,691 4 years ago
Video Not Working? Fix It Now

निसर्ग जीवन जगणारी ही रान पाखरं.... वाऱ्यसोबत नाते जोडून डोलणारी झाडांना पुजून मातीशी इमान राखून जगणारी प्रभूची लेकरे.. मातीची घरे जपत आणि मातीतच जीवन फुलवणाऱ्या हे लोक औद्योगिक विकासाच्या मागे धावणाऱ्या माणसाला शाश्वत जीवनशैली चे महत्व सांगत आहेत... अमर्यादित कार्बन उत्सर्जना मुळे होत असलेली जागतिक तापमान वाढ रोखणे अशक्य बनले आहे पृथ्वीवरील नैसर्गिक संसाधने आपण संपवत चाललो आहोत मायीनिंग रिफायनरी अणू भट्ट्या अश्या विनाशकारी प्रकल्पामुळे जग विनाशाच्या खाईत लोटले जात आहे.. माणसा माणसातील अंतर वाढत चालले आहे... शहरांमधली शुद्ध हवा पाणी आणि नैसर्गिक स्रोत जवळपास संपले आहेत. ..आता गाव खेडी ओरब डायला सुरुवात होईल...आमचे निसर्गाच्या कुशितले जीवन खूप खूप सुंदर आहे ... निसर्ग देवतेच्या छायेखाली स्वर्गीय जीवन जगणाऱ्या ह्या रान माणसांचे जीवन हेच मानव जात टिकवण्याचे एक आशा स्थान आहे... हे जगणे सुंदर आहे.... मातीची घरे सारवलेले खळे घरावरील नाळे दगडी जाते कार्वीच्या भिंती गवताचे मांगार बांबूच्या टोपल्या नांगर आणि गुठो जीवा पाड जपलेली झाडे प्राणी पक्षी ह्या सगळ्या वावरात लोटीवरी व्हायनात मसाला कुटणारी ग्रामीण स्त्री....हे सगळे हरवत चालले आहे ...जे ह्या गावाने जपले आहे.... निसर्ग जीवन शैली घडवणर्या भारतीय संस्कृतीला जपणारी आणि जगणारी हेच खरे भारतीय Special Thanks To The Local Bus YouTube: https://www.youtube.com/c/TheLocalBus Facebook: https://www.facebook.com/thelocalbus/ Instagram: https://www.instagram.com/thelocalbus

Comment