जिवंत झऱ्यांच्या पाण्यावर नैसर्गिक शेती करणारे "Ecosensitive गाव"| The Village of perennial streams
घनदाट जंगलातून वाहत येणारी नदीवर कोकणातल्या लोकांनी बागायती कश्या उभ्या केल्या ?
सह्याद्री च्या सदाहरित जंगला तील जिवंत झऱ्यां मुळेच गोव्याला पाणी देणारी कळणे नदी वर्षभर खळ खळ वाहत असते..
शेकडो वर्षांपासून ह्याच नदीच्या दोन्ही काठांवरील गावकरी जंगलाच्या सावलीत बागायती शेती करत आहेत... बागायती च्य मधोमध सुंदर चिरेबंदी कौलारू घर...कोकणी भाषेत ह्याला कुळगर म्हणतात...कुळगार हे गोव्याच्या शाश्वत आणि समृद्ध जीवन शैली च प्रतीक आहे... तिराळी म्हादाई नेत्रावळी च्या खोऱ्यात अशी संपन्न कोकणी गावे तुम्हाला बघायला मिळतील ..
ह्या सगळ्या समृध्टी च्या मागे आहे नदी ...तीला पाणी देणारे झरे आणि झऱ्याना जन्म देणारे डोंगर ..ज्यांना आपण विसरत चाललो आहोत..
जंगल तोडून शेती करणे ही भारताची परंपरा कधीच नव्हती... जे जंगल आम्हाला जीवन देते ते देवराई म्हणून राखण्याची आमची संस्कृती आहे....
रविषाचंद्रो घनावृक्ष नदी गावश्च सज्जना येथे परोपकाराय लोके देवेन निर्मित