करोडो रुपये घेऊन मुंबईतील टोरेस कंपनीचा मालक फरार झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. कंपनीने गुंतवणूकदारांना ५०० कोटींचा गंडा घातला आहे. त्यामुळे या कंपनीच्या कार्यालयाबाहेर गुंतवणूकदारांनी गर्दी केल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला आहे. सोने, चांदी, हिरे यांची विक्री करणाऱ्या टोरेस कंपनीकडून गुंतवणूकदारांना दर आठवड्याला १० टक्के व्याजाने पैसे परत करण्याची हमी देण्यात आली होती. कंपनीने अशा स्वरुपाची अनेक आमिषं दाखवून सगळी गुंतवणूक मिळवली होती. आणि अशातच कंपनी प्रशासन सर्व शाखा बंद करुन फरार झाली आहे. या प्रकरणाविषयी संपूर्ण माहिती.
मुंबई तरुण भारत दिवाळी अंक - 2024 : विषय वैविध्याने नटलेला दै. 'मुंबई तरुण भारत'चा दिवाळी अंक म्हणजे साहित्यिक फराळच! रिपोर्ताज, कला, संस्कृती, अर्थकारण आणि समाजातील ज्वलंत प्रश्नांचा विश्लेषणात्मक कानोसा... सोबत दिलेल्या लिंंकवर क्लिक करा आणि आजच आपला अंक ऑर्डर करा.
https://www.amazon.in/dp/B0DKTSZVRF