MENU

Fun & Interesting

रंगपंढरी Face-to-Face: Mohan Joshi - Part 1

Video Not Working? Fix It Now

मोहन जोशी - सिर्फ नाम ही काफी है ! रुबाबदार व्यक्तिमत्त्व, रंगभूमीवर प्रवेश करताक्षणी प्रेक्षागृहाचा चैतन्यमय कायापालट करणारी ऊर्जा, उत्स्फूर्त आणि सहजसुंदर अभिनय, आणि कुठलीही व्यक्तिरेखा लेखकाने आपल्याला समोर ठेवूनच लिहिली असावी इतकी चपखल सादर करणं ह्या अद्वितीय कलागुणांमुळे मोहन सरांचे नाव केवळ मराठीच नव्हे तर संपूर्ण देशातील सर्वश्रेष्ठ नटांमध्ये मानाने घेतलं जातं. 'नाथ हा माझा', 'कार्टी काळजात घुसली', 'मोरूची मावशी', 'सुखांत', 'श्री तशी सौ', 'आसू आणि हसू', 'कलम ३०२', 'तरुण तुर्क म्हातारे अर्क', 'गाढवाचं लग्न', 'मी रेवती देशपांडे' अशा असंख्य नाटकातील त्यांच्या अविस्मरणीय भूमिका प्रेक्षकांना विलक्षण आनंद देऊन गेल्या. याखेरीज जवळजवळ ६०० मराठी आणि हिंदी चित्रपट आणि अनेक टीव्ही मालिकातूनही मोहन सरांनी गेली ५० वर्षं रसिकांचे मनोरंजन केलं आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष म्हणून मोहन सरांची १३ वर्षांची कारकीर्द त्यांच्या नेतृत्वगुणांची आणि रंगभूमीसाठी त्यांनी केलेल्या भरीव योगदानाची साक्ष देते. यादरम्यान त्यांनी नट तसेच रंगभूमी कामगार यांच्यासाठी राबवलेले उपक्रम आणि मुंबईतील यशवंत नाट्यगृहाचे नवनिर्माण हे विशेष उल्लेखनीय म्हणावे लागतील. झी गौरव सन्मान, नाट्यदर्पण पुरस्कार, फिल्मफेअर आणि स्क्रीन अवॉर्ड, विष्णुदास भावे सन्मान, संगीत नाटक अकादमी पुरस्कार असे मिळालेलं अनेक एकाहून एक मानाचे पुरस्कार मोहन सरांच्या असामान्य अभिनयगुणांची, आणि समीक्षक व प्रेक्षकांच्या कौतुकाची पावती आहेत. आजच्या भागात मोहन सर सांगताहेत त्यांच्या अभिनयप्रक्रियेविषयी.

Comment