कोणी कितीही ठोसे मारले, कितीही टक्केटोणपे खावे लागले तरी पुन्हा ताठ उभी राहणारी ती बाहुली असते ना? ती सतत हसतमुख असणारी बाहुली...
अनेक अपघात आणि पराकोटीच्या शारीरिक आणि भावनिक आव्हानांवर मात करुनही प्रसन्न आणि सकारात्मक असणाऱ्या सुकन्या कुलकर्णींच्या नाट्यप्रवासाला ह्या हसऱ्या बाहुलीचं रूपक समर्पक ठरावं. फरक फक्त हा की त्यांचा अभिनय मात्र विलक्षण सजीव आणि परिपक्व आहे.
'झुलवा, 'नागमंडल', 'चाणक्य विष्णुगुप्त', 'जन्मगाठ', 'कुसुम मनोहर लेले', 'लेकुरे उदंड झाली', 'ती फुलराणी', 'सेल्फी' अशा अनेक गाजलेल्या नाटकांतून, असंख्य चित्रपटांतून आणि मालिकांतून जगभरातील रसिकांचं मनोरंजन करत आलेल्या सुकन्या ताई आज मराठी रंगभूमीवरील एक श्रेष्ठ अभिनेत्री म्हणून गणल्या जातात.
आजच्या भागात ऐकूया त्यांच्या विलक्षण संघर्षाबद्दल आणि त्यांच्या अभिनयप्रक्रियेबद्दल.