MENU

Fun & Interesting

Gazal mushayara one, 10वे अखिल भारतीय मराठी ग़ज़ल संमेलन, अकोला

Creative art Studio 17,788 2 years ago
Video Not Working? Fix It Now

10 वे अखिल भारतीय मराठी ग़ज़ल संमेलन, अकोला येथे संपन्न झालेला मुशायरा * मुशायऱ्याच्या अध्यक्षा : ~ नीता भिसे * सुत्रसंचालन : ~ अनंत नांदूरकर (खलिश) आणि गजानन वाघमारे मराठी ग़ज़ल सम्मेलन म्हणजे ग़ज़लकारांसाठी पंढरीची वारीच जणू.. ग़ज़ल ही ज्यांच्या जिवनाचा श्वास आहे असे आदरणीय दादा ग़ज़लनवाज पं.भीमराव पांचाळे यांच्या उपस्थितीत ग़ज़ल सागर प्रतिष्ठान मुंबई आणि तिक्ष्णगत मल्टीपर्पज वेल्फेअर सोसायटी द्वारा आयोजित या सम्मेलनाची धुंदी अजूनही कायम आहे.. मी बघता बघता माझ्या दुःखाचे गाणे करतो म्हणणारे आणि ईतरांनाही आपल्या दुःखाचे गाणे करायला लावणारे आदरणिय दिलीपजी पांढरपट्टे यांची अध्यक्षता लाभलेलं हे सम्मेलन ... उद्घाटनासाठी साक्षात नागराजजी मंजुळे यांची उपस्थिती सम्मेलनाला चार चांद लावून गेली.. ग़ज़लसरा हा विद्यानंद हाडके आणि जिंदगी भाकरीच्या दबावात आहे हा किरणकुमार मडावी यांच्या संग्रहाची प्रकाशने..बरोबरच किशोर बळी यांच्या गुरु आयोनी लडका या कादंबरीचं प्रकाशन.. परिसंवाद,मुक्तचर्चा,मुशायरे आणि मैफिली..भरगच्च झालं सगळं..आणि दादाची मैफिल आणि त्यांना मिळालेली दाद.. सगळंच लाजवाब ..शेवटी ग़ज़लरसिकांनी उभे राहून दादांसाठी केलेली टाळ्याची बरसात विसरता न येणारी आहे. आयोजनासाठी सुगतजी वाघमारे सर व संजयजी खडसे सर आणि त्यांच्या सर्व टीमचे आभार कुठल्या शब्दात मांडावे हाच प्रश्न आहे.. ग़ज़लकार मित्रांच्या भेटीने मन काठोकाठ भरुन गेलं आहे. या सम्मेलनाचं चांदणं मनात असंच दरवळत राहील..

Comment