घनगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्याच्या पुणे जिल्ह्यातील एक किल्ला आहे. लोणावळ्यापासून भांबर्डे व त्यानंतर एकोले गाव लागते. या गावी घनगड किल्ला अगदी मध्यभागी आहे. चढायला फारसा अवघड नसणारा किल्ला मात्र देखणा आहे. या गडाचे प्रथम प्रवेशद्वार आजही अस्तित्त्व टिकून आहे. वाघजाईचे मंदिर पाण्याचे टाके िऱ्याने? जाणारी वाट ही या किल्ल्याची वैशिष्ट्ये आहेत. सदर किल्ल्याचा मुख्य दरवाजा आज नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. मात्र तरीही गडमाथ्यावर आजही चिलखती बुरुज, काही वाड्याचे अवशेष, पाच-सहा पाण्याची टाकी आहेत. गडावरून सुधागड अप्रतिम दिसतो. तसेच दरीच्या पलीकडे तैलबैला ही सुंदर दिसतो.
#ghangad #fortsinmaharashtra #travel #sinhgadfort #shivajimaharaj #trekking #mountains #sahyadri