MENU

Fun & Interesting

शाहीर मिराताई उमप | भारूड | God Gifted Cameras |

God Gifted Cameras 2,887,776 2 years ago
Video Not Working? Fix It Now

#GodGiftedCameras #GGC . #bharud #folkart #folkmusic . शाहीर मिराताई उमप भारुड सादर करणाऱ्या महाराष्ट्रातील प्रसिद्ध कलावंत. संतांचे अभंग म्हणजे रूपकाश्रयी अभंग. या अभंगांचीच अभिनित भारूडे झाली. ही भारूडे सादर करणाऱ्या मीराबाई उमप यांचे नाव मानाने घेतले जाते. जन्म मातंग समाजातील वामनराव उमप या आर्थिकदृष्ट्या दूर्बल असलेल्या एका सामान्य कुटुंबात अंतरवली, ता. गेवराई जि. बीड येथे झाला. घरात गायन वादनाचा वारसा. तो वडील वामरावांपर्यंत आला. भारूड, आख्यान आणि पोवाडे यांचे सातत्यपूर्ण गायन त्यांनी केले आहे. महाराष्ट्रातल्या खेडया पाडयात, गावगाडयात मीराबाई दिमडीवरच भारूड करतात. फक्त पारंपरिक नाही तर आधुनिक काळात, समाजाला भेडसवणाऱ्या समस्यांना आपल्या गायकीच्या माध्यमातून वाचा फोडते. हुंडाबंदी,दारूबंदी, स्त्री-भृणहत्या, एड्स यासारख्या समस्यांवर भारूड-भजनाच्या माध्यमातून समाजप्रबोधन करतात. दलित समाजाला डॉ.बाबासाहेब आंबेडकराच्या आशीर्वादाने माणूस म्हणून जगण्याची उर्मी मिळाल्यामुळे संत विचारसोबत बाबासाहेबांना ते आपले दैवत मानतात. मीराबाई एकदाच गायन, त्याबरोबर खंजिरी वादन तसेच एकपात्री अभिनय करून अभिनयाचे चालते बोलते नाट्यशास्त्र उभे करतात. मीराबाईच्या प्रबोधनकारी धाटणीमुळे आणि वैचारिक लोकगायकीमुळे आज त्या लोकमानसात प्रसिद्ध झाल्या आहेत. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार, बालगंधर्व पुरस्कार, लक्ष्मीबाई कोल्हापूरकर पुरस्कार, महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्याचा राज्य पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी मीराबाईंना गौरवण्यात आले आहे. #शाहीरमिराताईउमप #भारूड #MarathiFolkMusic #TraditionalMusic #MaharashtraCulture #FolkSongs #MarathiSahitya #DevotionalSongs #CulturalHeritage #MarathiBhajan #ShahirMirataiUmap #Bharud #FolkPerformance #MarathiArt #MaharashtraTradition . Subscribe to God Gifted Cameras here: https://bit.ly/SubscribeGodGiftedCameras Follow us on Instagram: https://www.instagram.com/godgiftedcameras/ Like us on Facebook: https://www.facebook.com/GodGiftedCameras/

Comment