दिनांक 30 मे 2024 रोजी परमहंस परिव्राजकाचार्य श्री लोकनाथतीर्थ स्वामी महाराज महायोग ट्रस्ट जागतिक मुख्य केंद्र नाशिक येथे प प श्री गोविंद देवगिरी स्वामी महाराज यांचे आगमन झाले. स्वामीजींकडे सध्या अयोध्या धाम येथील श्रीराम मंदिराचे कोषाध्यक्ष म्हणून जबाबदारी आहे. याच वेळी परमपूजनीय नारायणरत्न श्री प्रकाशराव प्रभुणे महाराज यांचा अमृत महोत्सव सोहळा साजरा करण्यात आला. या सोहळ्यासाठी अनेक साधक उपस्थित होते.