कपाशीसाठी सघन लागवड प्रणाली (एचडीपीएस)
भा.कृ.अनु.प.- केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूरने कपाशीसाठी सघन लागवड प्रणाली (एचडीपीएस) विकसित केली आहे ज्यात कोरडवाहू शेतीमध्ये चांगले उत्पादन घेण्याची क्षमता आहे. समकालीन कॉम्पॅक्ट बीजी-२ संकरांसाठी उथळ काळ्या आणि लाल माती असणाऱ्या कोरडवाहू शेतीमध्ये ९० सेमी x १५ सेमी या अंतरावर सघन लागवड पद्धत (एचडीपीएस) अधिक योग्य आहे. तसेच मध्यम खोल ते सुपीक काळ्या जमिनीत ९० सेमी x ३० सेमी अंतरावर मध्यम घनतेचा प्रणालीचा अवलंब केला जाऊ शकतो.
सघन लागवड प्रणाली साठी कपाशीच्या जाती निवडण्याचे निकष
कॉम्पॅक्ट (Compact) तसेच लहान फांद्या ज्यामध्ये पहिल्या स्थानावर बोंडे धारण करण्याची चांगली क्षमता असते.
सरळ वाढणारे तसेच लहान पाने आणि कमी उंची असलेले वाण, रस शोषक कीड आणि रोगांना ग्रा.)
लवकर तसेच एकाचवेळी बोंडे परिपक्व होणारे आणि यंत्राद्वारे वेचणी करण्यास अनुकूल असलेले वाण.
सेंद्रिय शेती अभ्यासक निखिल तेटू
9529600161
#agriculture #automobile #bee #experiment #farming #nature #beemix