MENU

Fun & Interesting

महाराष्ट्रातील हिंदकेसरी विजेते | Hind Kesari Winners in Maharashtra

Amol Ghadge 236,352 lượt xem 3 years ago
Video Not Working? Fix It Now

#HindKesari #MaharashtraKesari #BharatKesari #Kusti #Pehlwani
महाराष्ट्रातील हिंदकेसरी विजेते | Hind Kesari Winners in Maharashtra

हिंद केसरी स्पर्धेची सुरवात १९५८ साली झाली. पहिला हिंदकेसरी हा रामचंद्र बाबू हे मल्ल झाले ही स्पर्धा १९५८ साली गोषमहल स्टेडियम हैद्राबाद येथे झाली. अखिल भारतीय कुस्ती संघटनेच्यावतीने घेतलेल्या पहिल्या स्पर्धेत महाराष्ट्राच्या श्रीपती खंचनाळे यांनी १९५९ साली पहिला हिंदकेसरी होण्याचा मान मिळवला.

सन १९५९ मध्ये दिल्ली येथे झालेल्या प्रथम हिंद केसरीसाठी खडकसिंग विरुद्ध श्रीपती खंचनाळे यांच्यात लढत झाली त्यात श्रीपती खंचनाळे यांनी खडकसिंग यांना चिटपट केले. त्यानंतर बंतासिंग यांच्याशी लढत झाली, मात्र ती निर्णायक न झाल्याने दुसर्‍या दिवशी बंतासिंग यांच्या बरोबर पुन्हा लढत होऊन त्यांना चितपट केले. त्यानंतर श्रीपती खंचनाळे हे हिंद केसरीचे मानकरी ठरले. त्या वेळी खंचनाळे यांना हिंद केसरी मानाची गदा हा किताब डॉ. राजेंद्र प्रसाद व पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

सन १९६० मध्ये मुंबई येथे झालेली हिंद केसरी कुस्ती स्पर्धा खडकसिंग विरुद्ध गणपतराव आंदळकर अशी झाली व आंदळकर यांनी खडकसिंग यांना चितपट केले व हिंद केसरी किताबचे मानकरी ठरले त्यावेळचा किताब यशवंतराव चव्हाण व बाळासाहेब देसाई यांच्या हस्ते प्रधान करण्यात आला

सन १९६४ मध्ये कर्नाल हरियाणा मध्ये झालेल्या हिंद केसरी कुस्ती स्पर्धेत सांगली जवळच्या कवठेपिरान गावातील मारुती माने यांनी 6 फूट 5 इंच उंचीच्या मेहरदीन पैलवानावर मात करून हिंद केसरी किताब प्राप्त केला

सन १९६६ मध्ये अहमदाबाद (गुजरात) येथे झालेल्या हिंद केसरी कुस्ती स्पर्धेत सोलापूर जवळील आचेगावातील हजरत पटेल यांनी हिंद केसरी किताब प्राप्त केला गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री हितेंद्र देसाई यांच्या हस्ते त्यांना मानाची गदा देवून सन्मानित करण्यात आले होते.

सन १९६९ मध्ये कानपूर, उत्तर प्रदेश येथे झालेल्या हिंद किसरी कुस्ती स्पर्धेत लातूर जिल्ह्यातल्या निलंगा तालुक्यातील रामलिंग मुदगड या गावचे हरिश्‍चंद्र माधवराव बिराजदार यांनी झारखंडेराय यांना चितपट करून हिंद केसरी किताब प्राप्त केला. तसेच १९७२ साली वाराणसी येथे झालेल्या स्पर्धेत नेत्रपाल नावच्या दिल्लीच्या पैलवानाला हरवत स्तम-ए-हिंद हा किताब मिळवला

सन १९७१ मध्ये नागपूर येथे झालेल्या हिंद किसरी कुस्ती स्पर्धेत मूळचे उत्तर प्रदेश मधील असलेले परंतु कोल्हापूर मध्ये स्थायिक झालेले मल्ल दीनानाथसिंह यांनी बिहारचे पैलवान लाल बहादूर सिंग यांना चितपट करत हिंद केसरी किताब प्राप्त केला

सन १९७३ मध्ये मुंबई येथे झालेल्या रुस्तम-ए-हिंद केसरी कुस्ती स्पर्धेत राधानगरी तालुक्‍यातील अर्जुनवाडा गावातील दादू मामा चौगुले यांनी रुस्तम-ए-हिंद किताब प्राप्त केला

सन १९७५ मध्ये बंगळूरु, कर्नाटक येथे झालेल्या हिंद केसरी कुस्ती स्पर्धेत मूळचे कर्नाटकमधील मुत्नाळ गावचे असलेले पैलवान पण कोल्हापूरच्या मोतीबाग तालमीत सराव करणारे चंबा मुत्नाळ यांनी हिंद केसरी किताब प्राप्त केला

सन २००३ मध्ये नाशिक येथे झालेल्या हिंद किसरी कुस्ती स्पर्धेत कोल्हापूरचे विनोद चौगुले यांनी पैलवान सुरेंद्र नाड यांना चितपट करत हिंद केसरी किताब प्राप्त केला. १९७३ सालचे रुस्तम-ए-हिंद केसरी दादू मामा चौगुले हे विनोद चौगुले यांचे वडील आहेत

सन २००५ मध्ये अहमदनगर येथे झालेल्या हिंद किसरी कुस्ती स्पर्धेत पुण्यातील मल्ल योगेश दोडके यांनी हरियाणाच्या प्रवीण कुमार वर मात करून हिंद केसरी किताब प्राप्त केला

२०१० साली पंजाबच्या जरखड येथे झालेल्या रुस्तम-ए-हिंद केसरी कुस्ती स्पर्ध्येत पंजाबच्या कमलजितला ५-३ गुण फरकाने पराभूत करत अमोल बुचडे यांनी रुस्तम-ए-हिंद किताब आपल्या नावी केला

सन २०१३ मध्ये हरियाणा मधील भिवानी येथे हिंद किसरी स्पर्धा प्रथमच मॅटवर खेळवली गेली स्पर्धेच्या अंतिम लढतीत पुण्याचे मल्ल अमोल बराटे यांनी हवाई दलाच्या सोनूकुमार यांना चितपट करत हिंद केसरी किताब प्राप्त केला

२९ जानेवारी ते १ फेब्रुवारी २०१५ दरम्यान कर्नाटक मधील जामखंडी येथे झालेल्या हिंद किसरी कुस्ती स्पर्धेत सोलापूरजवळच्या सांगोला तालुक्यातील बामणी गावातील सुनिल साळुंखे यांनी पंजाबच्या हितेश कुमारला चीतपट करत हिंदकेसरी किताबावर नाव कोरले.

Comment