MENU

Fun & Interesting

संगीत व आनंद अनुभूती : HOW MUSIC RELATES TO MIND: LECTURE BY DR MILIND PATWARDHAN, WELL-KNOWN EXPERT

Naad Madhuri 1,998 2 months ago
Video Not Working? Fix It Now

नाद माधुरी चॅनलवर आपण आमच्या गुरू डाॅ.माधुरीताई डोंगरे यांच्या विविध रचना व नवरागातील बंदिशी ऐकत असतो, त्याचबरोबर संगीत संबंधीत विविध विषयांचे मार्गदर्शन ही घेत असतो. दोन भागांच्या या व्याख्यान-मालेचा पहिला खंड आहे "संगीत व आनंद अनुभूती" व दुसरा, "संगीत आणि आत्मानुभूती". प्रथम आपण माधुरीताईंचे बंधु,नामवंत डाॅक्टर , डाॅ. मिलिंद पटवर्धन यांचे कडून "संगीत व आनंद अनुभूती" या विषयाची माहिती घेणार आहोत. संगीताची नादातून झालेली निर्मिती व त्याचा विकास आणि मेंदूची उत्क्रांती हे दोन्ही टप्प्याटप्याने व एकाच वेळी कसे होत गेले हे ही फार सुंदर रीतीने सांगीतले आहे. डॉक्टर मिलिंद पटवर्धन हे मिरजेला स्थाईक असून,सुप्रसिद्ध इंडोक्रोनाॅलाॅजिस्ट व मधुमेह तज्ञ आहेत. या विषयांवर त्यांची पुस्तके ही प्रसिद्ध आहेत व सामाजिक क्षेत्रात ही त्यांचे भरपूर योगदान आहे. आपल्या वैद्यकीय व्यवसायात व्यग्र असून ही आपला संगीताचा छंद त्यांनी जोपासला आहे व अध्यात्माचाही त्यांचा व्यासंग आहे . हा विडिओ दर्शकांना 'संगीत' ह्या कले मध्ये एक नवीन अंतरदृष्टी देईल.

Comment