दसरा संपला की दिवाळीची चाहूल लागते. दिवाळीच्या आधी आठवडाभर या दिवाळीत कोणकोणते पदार्थ घरात करायचे आणि कोणते बाहेरून आणायचे याची आखणी चालू होते. खरं तर बाहेरून आणण्यापेक्षा घरात तयार केलेल्या पदार्थांना एकतर तुमच्या हाताची चव असते, पदार्थ बनवतांना वापरलेले जिन्नस चांगल्या प्रतीचे असतात आणि विकत आणलेल्या पदार्थाच्या किमतींच्या तुलनेत घरात केलेले पदार्थ भरपूर प्रमाणात बनतात आणि पुरतातही!
प्रश्न असतो, तो फक्त योग्य मार्गदर्शन याचा. तर त्या साठी हा उपक्रम मी तुमच्या साठी घेऊन आली आहे की ज्याने तुमची मदत होईल. दिवाळीत तयार केल्या जाणाऱ्या विविध पदार्थ्यांच्या पाककृती अतिशय सोप्प्या करून या विभागात देण्यात आल्यात. काही
विशेष टिप्स आहेत ज्यांचा वापर करून आपण अवघड वाटणारा पदार्थ ही चटकन तयार करू शकता.
वेगवेगळ्या प्रकारचे लाडू, शंकरपाळ्या, करंज्या, अनारसे, चकल्या, शेव,चिवडा अशा दिवाळीच्या बहुतेक सर्व पदार्थांचा समावेश या विभागात करण्यात आला आहे. तेव्हा या दिवाळीत तुमच्या हाताने तयार केलेल्या घरगुती फराळाची चव सगळ्यांना चाखू द्या आणि इतरांनी केलेल्या कौतुकाने, तुमचं मन समाधानाने भरून जाऊ द्या!
#kiranskitchenmarathi
#diwalifoodseries
#diwalirecipes
#diwalighargutirecipe
#faralrecipe
#diwalifaralrecipe
#diwaliredipes
#homemaderecipe
#perfectrecipes
#instantrecipe
#diwalighargutifaralseries
#ghargutifaralfoodbusiness
#easyrecipe
#simplerecipe
#perfectmeasurmentsallingredients
#womensspeacial