√शंभर टक्के #हुमणी अळी नियंत्रण. कृषी तज्ञांचे मार्गदर्शन #humni #niyantran
कृषी तज्ञ
मा श्री पद्मनाभ शिवाजी मस्के (सर) M.sc.Agri
#तालुका #कृषी अधिकारी श्रीगोंदा.
विशेष आभार
#जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अहमदनगर
प्रकल्प संचालक आत्मा अहमदनगर
तालुका कृषी अधिकारी श्रीगोंदा
मंडळ कृषी अधिकारी श्रीगोंदा
टोल फ्री क्रमांक 18002334000
#किसान कॉल सेंटर
18001801551
हुमणी ही अतिशय हानिकारक आणि सर्वत्र पसरलेली कीड असून या किडीची आळी #ऊस #भुईमूग #बाजरी #ज्वारी तसेच #फळे आणि #भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान करते पिकांमध्ये प्रादुर्भाव झाल्यानंतर या किडीची अळी पिकांची मुळे कुरतडून खाते त्यामुळे पिकांच्या पानांचा रंग पिवळा पडू लागतो कालांतराने पाने वाळतात आणि नंतर रोप किंवा झाड वाळून जाते. महाराष्ट्र मधील हजारो हेक्टर वरील जमिनीमधील पिकांचे अतोनात असे नुकसान केले आले आहे.
#हुमणी चे जीवन चक्र
मे जून-जुलै = भुंगा अवस्था
ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी =अळी अवस्था
फेब्रुवारी मार्च एप्रिल मे = कोष अवस्था.
हुमनी नियंत्रण हा सर्वात सोपा पर्याय म्हणजे हुमणीचे भुंगे नष्ट करणे.
जून-जुलै या कालखंडामध्ये पहिल्या पावसात कोषावस्थेत मधून नर मादी भुंगे बाहेर पडतात आणि कडुलिंब बोर बाभूळ या झाडांवर राहतात. नर मादी भुंगे यांचे मीलन होऊन मादी भुंगा जमिनीमध्ये 50/60 अंडी घालते. त्या अंड्यांमधून 10 ते 15 दिवसात अळी तयार होते.
नियंत्रण
शेताच्या कडेला असणाऱ्या झाडांच्या जवळ किंवा तीन बांबूच्या सहाय्याने 100 वॅटचा बल्प लावावा. बल्प च्या खाली 10 ते 15 सेंटिमीटर खोलीचा खड्डा करून त्यामध्ये प्लॅस्टिक कागद टाकून तो खड्डा पाण्याने भरून घ्यावा. त्या पाण्यामध्ये मोटरसायकल सर्विसिंग झाल्यानंतर निघालेले काळे आॅईल टाकावे. पाण्याचे आणि बल्पचे अंतर साधारण दोन ते तीन फूट असावे. बल्प चा वापर करताना जुने बल्ब वापरावे सीएफएल चे बल्प किंवा एलईडी बल्प नको. हुमणीचे भुंगे पिवळ्या रंगाच्या लाईट कडे जास्त आकर्षित होतात. रात्रभर बल्प चालू ठेवावा. उजेडामुळे हुमणीचे भुंगे आकर्षित होऊन बल्पजवळ येतात आणि पाण्यामध्ये पडून मरून जातात. अशा प्रकारचा प्रकाश सापळा एक एकरातील हुमणीचे सर्व भुंगे मारून टाकतो. हुमनी किडीची पिकांमध्ये बाधा झाल्यानंतर हजारो रुपयांची कीटकनाशके पाण्याद्वारे सोडण्यापेक्षा हा एक प्रकाश सापळा अत्यंत कमी खर्चामध्ये हुमणी किडीचे शंभर टक्के नियंत्रण करतो.
शेतकरी मित्रांनो या प्रकाश सापळ्यांचा वापर तुम्ही करा आणि तुमच्या शेजारील शेतकऱ्यांना सुद्धा सांगा.
आधुनिक शेती व शेतीपूरक व्यवसाय यांचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी #बळीराजा #स्पेशल यूट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा
🙏🙏धन्यवाद🙏🙏
यूट्यूब
http://YouTube.com/balirajaspecial
फेसबुक
https://www.facebook.com/balirajaspecial/
इंस्टाग्राम
https://www.instagram.com/balirajaspecial?r=nametag
ट्विटर
https://twitter.com/DiwateRamrao?s=08