#farming #rice #agriculture #BBCMarathi
पुण्यातील भोर, मावळच्या पट्ट्यात होणारा इंद्रायणी तांदूळ खूप लोकप्रिय आहे. तिथल्या शेतकऱ्यांनी इंद्रायणी तांदळाच्या अस्सल वाणांचं संवर्धन करत अनेक शेतकऱ्यांना हा तांदूळ आपल्या शेतात पिकवण्याची प्रेरणा दिली. अहिल्यानगरमध्येही या इंद्रायणी तांदळाचं पीक घेण्याकडे अनेक शेतकऱ्यांचा कल दिसून येतो. अहिल्यानगर जिल्ह्यातला अकोलेच्या घाटमाथ्याचा प्रदेशात पाडाळणे गाव आहे. इथला परिसर पर्यटनासाठीही प्रसिद्ध आहे. पावसाचं प्रमाण जास्त त्यामुळे इथल्या शेतकऱ्यांचा भात हे पीक घेण्याकडेच मुख्य कल असतो. पण पारंपरिक भातशेतीला नाकारत पाडाळणे गावातील शेतकऱ्यांनी दहा वर्षांपूर्वी बाजारात मागणी असणाऱ्या इंद्रायणी भाताची निवड केली. आणि त्याचं भरघोस उत्पन्न त्यांना मिळू लागलं. आज पाडळणे गाव इंद्रायणी तांदळाचा हब म्हणून ओळखलं जातं. पण तज्ज्ञ सांगता- मोनोक्रॉप म्हणजे एकपीक पद्धत जमिनीला मारक ठरू शकते. त्याविषयीचा हा बीबीसी प्रतिनिधी श्रीकांत बंगाळे यांचा रिपोर्ट.
शूट- किरण साकळे
व्हीडिओ एडिट- अरविंद पारेकर
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 https://whatsapp.com/channel/0029Vaa8TxTIyPtQpqWBTh3j
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
https://www.facebook.com/bbcnewsmarathi/
https://twitter.com/bbcnewsmarathi