#BolBhidu #ChampionsTrophy2025 #INDvdNZ
टीम इंडिया लीग स्टेजमध्ये एकही मॅच हारली नाही आणि चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमीफायनलमध्ये गेली, त्यानंतर सेमी फायनलमध्ये टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाला सहज हरवलं आणि मग फायनल गाठली. ही फायनल होईल न्यूझीलंडविरुद्ध. पण भारत-न्यूझीलंड मॅच होण्याच्या आधीच टीम इंडियावर टीका झाली. टीका करणाऱ्यांमध्ये आजी माजी प्लेअर्स होते, न्यूझीलंडच्या केन विल्यमसन आणि रचिन रवींद्रचं म्हणणं होतं की टीम इंडिया त्यांच्या सगळ्या मॅचेस दुबईच्या ग्राऊंडवर खेळते याचा त्यांना फायदा होतो.
तर साऊथ आफ्रिकेच्या डेव्हिड मिलरचं म्हणणं होतं की, दुबई-लाहोर असा प्रवास करुन आम्ही थकलोय, फायनलमध्ये माझा पाठिंबा न्यूझीलंडला असेल. माजी क्रिकेटर्सपैकीही बऱ्याच जणांनी टीम इंडिया कशी दुबईलाच खेळतीये, त्यांच्या हिशोबानं सगळी टूर्नामेंट प्लॅन केली गेली आहे, असे अनेक आरोप केले. आयसीसी म्हणजेच बीसीसीआय अशी टीका सुद्धा झाली. पण चॅम्पियन्स ट्रॉफी खरंच टीम इंडियाच्या सोयीनुसार आयोजित करण्यात आली का ? टीम इंडियाला प्रत्येक वेळी आययीसीच्या मॅनेजमेन्टचा फायदा मिळतो का ? नेमकं सत्य जाणून घेऊयात या व्हिडीओमधून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : https://www.facebook.com/BolBhiduCOM
➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu
➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu.com/
➡️Website: https://bolbhidu.com/