#BolBhidu #JainMonkLife #JainDikshaCeremony
दीक्षा घेणारी एक व्यक्ती आधी नवरी किंवा नवरदेवासारखी तयार झालेली असते, डोक्यापासून पायापर्यंत दागिन्यांनी सजलेली असते, आजूबाजूला लग्न किंवा एखाद्या कार्यक्रमाला जमतात तशी हजारो लोकं असतात. मात्र पुढच्याच क्षणी हि व्यक्ती अंगावरचे दागिने काढून टाकते. तिच्या डोक्यावरचे केस काढून टाकले जातात. अंगावरचे झगमगलेले कपडे काढून पांढऱ्या रंगाची वस्त्र परिधान केली जातात आणि एका साधूच्या वेशात हि व्यक्ती समोर येते. असे जैन लोकांचे दीक्षा घेतानाचे व्हिडीओ तुम्ही सोशल मीडियावर पाहिले असतील. हे व्हिडीओ पाहून आणि त्यांच्या अंगावरचे दागिने आणि कार्यक्रमाची भव्यता बघून तुम्हाला नक्कीच प्रश्न पडला असेल कि इतका पैसा आणि श्रीमंत असताना देखील, हे ऐशोरामाचं सुखी आयुष्य सोडून या व्यक्तीने हे कष्टाचं आणि दुःखाचं आयुष्य का निवडलं असेल? या जैन साधूना आयुष्यभर आपल्या घराचा, सगळ्या सुखांचा त्याग करावा लागतो, अंघोळ करणं, केस कापणं यांसारख्या आपल्याला बेसिक वाटणाऱ्या गोष्टी करण्याची मुभाही या जैन साधूंना नसते. दीक्षा घेतल्यानंतर नेमकं कसं असतं या जैन साधूंचं आयुष्य? दीक्षा घेण्याची प्रक्रिया कशी असते? आणि मागच्या काही वर्षात हे दीक्षा घेण्याचं प्रमाण इतकं का वाढलंय? पाहुयात या व्हिडिओमधून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : https://www.facebook.com/BolBhiduCOM
➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu
➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu.com/
➡️Website: https://bolbhidu.com/