श्रीक्षेत्र जाळीचा देव | Jalicha Dev | Chakradhar Swami | Mahanubhava | महानुभाव | Buldhana: https://youtu.be/EyJDU1n5HnA
"जाळीचा देव" हे महानुभाव पंथामधील भाविकांसाठी अत्यंत महत्त्वाचे धार्मिक ठिकाण आहे. या ठिकाणी श्री चक्रधर स्वामी यांचे काही काळ वास्तव्य होते.
श्रीक्षेत्र जाळीचा देव - अजिंठ्यापासून २८ आणि बुलडाण्यापासून २५ किलोमीटरवर महानुभाव पंथीयांचे "जाळीचा देव' हे पवित्र तीर्थक्षेत्र आहे. महानुभाव पंथांचे संस्थापक श्री चक्रधर स्वामी बाराव्या शतकात महाराष्ट्रभ्रमण करत होते. ते श्री चक्रधर स्वामी गंगातीराकडून कनाशी, भडगाव, पाचोरा, शेंदुणी, चांगदेव, हरताळा येथे आले. हरताळा येथून स्वामी सावळदबारा येथे आले. येथून वालसावंगी (जि. जालना) येथे जाताना या घनदाट अरण्यात करवंदाच्या जाळीच्या सावलीत विश्रांती घेण्यासाठी ते थांबले. त्या ठिकाणी यांना दोन वाघिणीची पिल्ले दिसली. ते त्या पिल्लांना आपल्या मांडीवर घेऊन त्यांना प्रेमाने कुरुवाळू लागले. तेवढ्यात वाघीण त्या ठिकाणी आली व गर्जना करू लागली . स्वामींनी तिच्याकडे कृपाकटाक्ष टाकताच ती पाळीव कुत्र्याप्रमाणे स्वामींकडे पाहून शेपटी हलवू लागली. ही लिळा(घटना) वृक्षवेलींनी बहरलेल्या जाळीमध्ये स्वामी बसले असताना घडली. म्हणून या तीथथक्षेत्राला जाळीचा देव हे नाव पडले. वाघोदा (जि. जळगाव) येथील भक्त (कै.) लक्ष्मणराव पाटील आपला कुष्ठरोग चांगला व्हावा यासाठी सन १९३६मध्ये येथे आले. त्यांनी येथे एकवीस दिवस उपवास करून नामस्मरण केले. एकविसाव्या दिवसी पहाटे तीनला एक साधू त्यांना स्वप्नात दिसले. व म्हणाले तू मला सावली कर, मी तुझा रोग नष्ट करतो. त्यानंतर थोड्याच दिवसात श्री. पाटील निरोगी झाले. स्वप्नात परमेश्वराला दिलेले अभिवचन पूर्ण करण्यासाठी त्यांनी या स्थानाभोवतीची झाडे झुडुपे काढून १९३८मध्ये मंदिराच्या बांधकामास सुरुवात केली. त्यावेळी तेथे निजामच्या बादशाहाची राजवट असल्यामुळे येथील अधिकारी बांधकामासाठी मंजुरी देत नव्हते. तेव्हा (कै.) श्री. पाटील व तेथील पुजारी (कै.) दत्तूबुवा हैदराबादला जाऊन बांधकामाची परवानगी घेऊन आले. १९४२मध्ये सभामंडपाचे काम पूर्ण होऊन कलशारोहण समारंभ थाटात झाला.
#jalichadev #mahanubhav_youtube_channel #mahanubhavudu #mahanubhav_panth #mahanubhav_panth_lilacharitra_uttarardh #mahanubhav_panth_aarti #mahanubhav_panth_pravachan #mahanubhav_panth_pravachan #mahanubhav #mahanubhav_panth_leelacharitra #chakradhar #chakradharpur #chakradharswami #hindu #hindutva #hinduism #temple #templesofindia #templestatus #maharashtratourism #maharashtratravel #dandavat #dandavatpranam #washim
#temples #temple #india #travel #templesofindia #photography #travelphotography #hinduism #templephotography #architecture #incredibleindia #photooftheday #hindu #travelgram #history #nature #ancient #templearchitecture #thailand #god #instagram #shiva #hindutemple #asia #karnataka #instagood #art #culture #ig #wanderlust
Disclaimer:
"This channel and I do not claim any right over any of the graphics, images, songs used in this video. All rights reserved to the respective copyright owners."