#BolBhidu #JyotiradityaScindia #MarathaHistory
सध्या इंस्टाग्रामवर एक रील व्हायरल होतंय, रील आहे केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांचं. या रीलमध्ये ज्योतिरादित्य सिंधिया आपलं डोकं जमिनीवर टेकवताना दिसतात, ते जमिनीला नमस्कार करतात आणि त्यानंतर कॅमेरा जातो, त्यांच्या समोर असलेल्या एका कमानीकडे, ज्यावर लिहिलेलं आहे, श्रीमंत महाराजा महादजी शिंदे प्रवेशद्वार, ग्रामपंचायत कण्हेरखेड आपले सहर्ष स्वागत करीत आहे. सिंधिया यांचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यात ते एका सभेत बोलत असतात आणि म्हणतात, 'मी या गावात पाहुणा म्हणून नाही तर मुखिया म्हणून आलो आहे.' ज्योतिरादित्य सिंधिया यांचे हे दोन्ही व्हिडीओज आहेत, सातारामधल्या कण्हेरखेड गावातले.
साताऱ्यातल्या कोरेगावमध्ये असलेल्या या गावात सिंधिया आले, इथल्या लोकांमध्ये मिसळले, इथली माती कपाळाला लावली, आपण गावाच्या विकासासाठी कायम कटिबद्ध असल्याचा शब्द दिला. सोबतच कोल्हापूरची अंबाबाई, तुळजापूरची तुळजाभवानी, पंढरपूरचा विठोबा, कोल्हापूरचा ज्योतिबा अशा महाराष्ट्रातल्या देवस्थानांना भेटीही दिल्या. पण जोतिरादित्य सिंधिया यांचं साताऱ्याशी, महाराष्ट्राशी नातं काय आहे ? शिंदे, सिंधिया या आडनावांचा आणि महाराष्ट्र ते ग्वाल्हेर पसरलेल्या पराक्रमाचा इतिहास जाणून घेऊयात या व्हिडीओमधून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : https://www.facebook.com/BolBhiduCOM
➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu
➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu.com/
➡️Website: https://bolbhidu.com/