*वेरूळ लेणी भाग ५*
*वेरूळ लेणी क्रमांक १६- कैलास लेणे*
आज आपण भेट देणार आहोत औरंगाबाद जिल्ह्यातील वेरूळ च्या विश्वप्रसिद्ध लेणीसमूहाला आणि पहाणार आहोत बौद्ध , जैन व हिंदू लेण्यांमधील मूर्तिकला,त्यापाठच्या कथा याचबरोबर प्राचीन महाराष्ट्राच्या इतिहासाचा वेध घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
*वेरुळची हिंदू लेणी ही बौद्ध लेण्यानंतर साधारण सातव्या ते आठव्या शतकात खोदण्यात आलेली लेणी आहेत. ही लेणी मुख्यत्वे शैव व वैष्णव म्हणून खोदण्यात आली आहेत ज्यातून विविध हिंदू पुराणातील कथांचे दर्शन होते.*
वेरूळ लेणींच्या ह्या पाचव्या भागात आम्ही लेणी क्रमांक १६ दाखवणार आहोत. कैलास मंदिर लेणे म्हणजे एकसंध खडकातून निर्माण केलेले अवर्णनीय अजरामर महाकाव्य आहे. २९ मी. उंच ५० मी. लांब आणि ३३ मी. रुंद असे त्याचे आकारमान आहे. शिवाचे निवासस्थान (सदन शिवाचे) म्हणून या लेण्याला कैलास लेणे असे म्हटले जाते. हजारो वर्षांपूर्वी हाती फक्त छिन्नी-हातोडा घेऊन अज्ञात कलाकारांनी हे शिल्प निर्माण करून आमच्या संस्कृतीचा ध्वज जगभर फडकवत ठेवलाय. राष्ट्रकूट सम्राटांच्या चार पिढ्यांची धर्मभावना आणि दातृत्व ह्यांच्या योगाने आजचे कैलास शैलमंदिर साकार झाले. शैलमंदिर (लेणी) या शिल्पप्रकाराची कैलास लेणे ही सर्वांत प्रगत अवस्था होय.
तीच दाखवायचा आमचा हा छोटासा प्रयत्न आहे.
हा भाग कसा वाटला हे आम्हाला कॉमेंट्स मध्ये नक्की कळवा.आमचे चॅनेल नक्की subscribe करा व तुमच्या परिचित लोकांना forward करा
महाराष्ट्रातल्या मराठवाडा भागात औरंगाबाद शहरापासून ३० किलोमीटर अंतरावर वेरूळ हे एक छोटे गांव आहे. औरंगाबाद हे जिल्ह्याचे ठिकाण महत्वाचे रेल्वे स्थानक आहे येथे विमानतळ सुद्धा आहे. येथून वेरूळच्या लेणीत जाण्यासाठी एसटी , रिक्षा , टॅक्सी खूपच सोप्या रीतीने मिळतात.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*संदर्भ -*
मिसळपाव ह्या संकेतस्थळाचा आम्हाला खूपच उपयोग झाला. वेरूळला जाणाऱ्या प्रत्येकाने आवर्जून वाचावे असे हे 6 माहितीपट आहेत.
त्यांच्या बहुमोल महितीमुळेच आम्ही ह्या लेणींची माहिती सादर करू शकलो. ह्याबद्दल आम्ही मिसळपाव संकेतस्थळाचे खूप खूप आभारी आहोत.
https://vishwakosh.marathi.gov.in/33013/
https://mr.m.wikipedia.org › wiki
वेरूळची लेणी - विकिपीडिया
http://www.durgbharari.com/------8.html
https://www.maayboli.com/node/61314
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Music Credits -
Song :
Bensound: "India" - Royalty Free Music
Website : https://www.bensound.com/royalty-free-music/track/india
Yoitube link - https://www.youtube.com/c/bensoundmusic
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
अधिक माहितीसाठी आम्हाला खाली दिलेल्या लिंक्स वर फॉलो करा.
Facebook : https://www.facebook.com/SNTvlogs/
Instagram : https://www.instagram.com/sahyadrinaturetrails