#Sahyathon2020 #SahyakadaAdventures #Kalakrai
Kalakrai pinnacle is also known as “Dhakcha Angatha” as it looks like a thumb. Kalakrai pinnacle climbing is quite famous and frequently visited by mountaineers. The way to the left of the ridge takes to the cliff, but a rope and rock climbing equipment with a Team of Experts is necessary for Summit. Kalakrai Pinnacle is of approx 200 feet rock climbing. Kalakrai pinnacle starts with 90 degree vertical climb then a short traverse with a thrilling move which again leads to a 90 degree Rock patch with breathtaking valley view.
साह्यकडा एडवेंचर
साह्यथॉन २०२० प्रमोशन अॅक्टिव्हीटी
दिनांक - १५ डिसेंबर २०१९
कळकराय प्रस्तरारोहन मोहिम
उंची - २०० फुट
श्रेणी - अवघड
ठिकाण - किल्ले ढाक
पायथा - जांभवली गाव
तालुका - मावळ
जिल्हा - पुणे
सन २०१९ ची अखेर होत आहे तर सन २०२० ची सुरूवात होऊ घातली आहे. सालाबाद प्रमाणे सन २०२० मध्येही साह्यकडा एडवेंचर च्या अॅक्टिव्हीटींची सुरूवात साह्यथॉन २०२० या मिनी मॅरेथॉन पासून होणार आहे. त्या साठी लागणारी यंत्रणा उभारण्याचे काम युद्ध पातळीवर चालू आहे. साह्यकडाच्या या मोठ्या इव्हेंटला प्रसिद्धी देण्याच्या उद्देशाने दरवर्षी आपण एक सुळका (Pinnacle) सर करून त्यावर साह्यथॉनचा बॅनर झळकावतो. त्यासाठी मागील वर्षी आपण योगेश सुळका सर केला होता. या वेळेस कळकराय हा २०० फुट क्लाईबिंग उंचीचा सुळका सर करण्याचे नियोजन करण्यात आले. कळकराय साठी क्लाईंबर टिमचा चांगला प्रतिसाद मिळाला आणी २४ गिर्यारोहकांनी नाव नोंदणी केली. ठरलेल्या नियोजनाप्रमाणे १५ डिसेंबरच्या पहाटे ५ वाजता आम्ही पिंपरी-चिंचवड सोडले. पुणे परिसरातील चाकण, लोहगाव, पुणे शहर आणी पिंपरी-चिंचवड मधून सहा कारणे २४ गिर्यारोहक जांभवली गावाकडे निघालो. प्रस्तरारोहन मोहिम म्हंटले की वेळेचे नियोजन अगदी काटेकोर पणे पाळावे लागते. येवढ्या पहाटे नाष्ट्याची सोय होणार नाही, हे लक्षात आल्यावर सौ. नी पहाटे नाष्टा बनवुन दिला. श्रीराम, विक्रांत आणी विराज यांच्या मदतीने प्रस्तरारोहन साहित्याची गणती तसेच तपासणी करून गाडीत लादले. भक्ती शक्तीच्या शिल्पा समोर सर्व टिम एकत्रित येणार होती, त्याप्रमाणे आम्ही भक्ती शक्तीला पोहोचलो. सर्वत्र आघाडीवर असणारे मोझे सर आमच्या आधीच पोहोचले होते. विलास अजून खडकीतच होता, तर लोमटे सर आपला रथ घेउन कामशेतला रवाना झाले होते. काही वेळातच विलास आला पण रघुनाथ सरांचा काही पत्ताच नव्हता. जसे रघुनाथ सरांनी दर्शन दिले तसे आम्ही लगेचच गाडीला स्टार्टर मारले. कामशेत पोलीस चौकी समोर भेटायचे होते, पण पहाटेच्या थंडगार वातवरणामुळे संचारलेल्या उत्साहात विलास आणी लोमटे सरांनी कान्हे गाठले. शेवटी कशीबशी सगळी मंडळी एकत्रित आली आणी आम्ही कामशेत मधुन नाने मावळात घुसलो. जांभवली पर्यंतचा रोड टकाटक झाला असल्याने आम्ही सुसाट निघालो. जांभवली ते कोंडेश्वर मंदिर हा रोड अजूनही कच्चाच आहे. कोंडेश्वरला पोहचलो तेव्हा सकाळचे ७:३० वाजले होते. सौ. नी दिलेल्या पोह्यांचा आस्वाद सर्व टिमने घेतला, ज्यांना चतुर्थी होती त्यांनी राजगिरा लाडू खाल्ले. शिल्लक राहिलेला नाष्टा कोंडेश्वरला आलेल्या इतर गिर्यारोहक मित्रांना दिला. प्रस्तरारोहन साहित्य, पाणी, टॉर्च, खाण्याचे पदार्थ सॅगेत भरले. सॅग पाठीवर लादल्या आणी क्लाईबिंग रोपाचे आभुषण गळ्यात माळले. कोंडेश्वराचे दर्शन करून किल्ले ढाकचा ट्रेक सुरू केला.
‘एक पाऊल आरोग्यासाठी !’ हे ब्रिद घेऊन समाजात आरोग्यविषयक जनजागृती करण्यासाठी घेण्यात येणाऱ्या ‘साह्यथॉन २०२०’ मिनी मॅरेथॉन मध्ये भाग घेण्याचे आव्हान करण्यात आले. कळकराय सुळका क्लाईबिंग मोहिमेत १७ वर्षापासून ते ५८ वर्षे वयोगटातील २४ गिर्यारोहकांनी सहभाग घेतला होता, त्यात ४ महिला गिर्यारोहकांचा समावेश होता. अवघड श्रेणीत असलेल्या कळकराय सुळका सर करण्यात सर्व गिर्यारोहकांना यश आले. मोहिम लीडर बाबाजी चौधरी, लीड क्लाईंबर राहूल खोराटे यांच्यासह अॅड. किरण दौंडकर, निखिल पोखरकर, श्रीराम पवळे, सचिन पाटील, विलास कुमकर, श्रीकांत लोमटे, अतुल खेडेकर, नागनाथ दोडके, श्रुतिका खांदवे, अश्विनी अहिरे, अमृता लोखंडे, केतकी लोमटे, पराग दार्वेकर, सुरेश अहिरे, प्रताप पाटील, श्रीकांत नागवडे, रघुनाथ खोसे, बाबासाहेब आव्हाड, धनराज मोझे, अरुण निकम, रोहित साबळे, आदित्य खांदवे यांनी सहभाग घेऊन सुळका सर केला.
बाबाजी चौधरी
साह्यकडा एडवेंचर प्रतिष्ठान
Sahyakada Adventure: https://www.facebook.com/Sahyakada/
FB: https://www.facebook.com/vilaskumkar
Google Plus: https://plus.google.com/u/0/+VilasKumkar
Twitter: https://twitter.com/vilaskumkar
Instagram: https://www.instagram.com/vilaskumkar/