MENU

Fun & Interesting

कोहोज किल्ला पालघर (वाडा) | KOHOJ FORT | संपूर्ण माहिती | थर्रारक अनुभव | मराठी VLOG | 2023

Video Not Working? Fix It Now

कोहोज किल्ला (वाडा) पालघर जिल्ह्यात अनेक लहान मोठे गडकिल्ले आपले अस्तित्व टिकवून आहेत. यापैकी वाडा पालघर रस्त्यावरचा 'कोहोज ' हा प्रमुख किल्ला. वाड्यापासून 10 ते 12 किलोमीटर अंतरावर हा किल्ला आहे. वाडा-मनोर हायवेवरील हा किल्ला सर्वांचे लक्ष वेधून घेतो. किल्ल्यावर जाण्यासाठी विविध वाटा आहेत. नाणे गाव, वाघोटा गाव तसेच गोरे गावातून देखील जाता येते. किल्ल्यावर जाण्यासाठी साधारणता दोन ते अडीच तास लागतात किल्ल्याचा इतिहास १६ व्या शतकाच्या सुरुवातीला पोर्तुगीजांनी गुजरातच्या राजाकडून हा प्रदेश जिंकून घेतला व या गडावर तट - बुरूज चढवले. शिवरायांनी कोहोजगड 1657 च्या दरम्यान जिंकून स्वराज्यात सामील करून घेतला. पुढे 12 जून 1665 च्या पुरंदरच्या तहानुसार मोगलांना जे 23 किल्ले शिवरायांनी दिले त्यात कोहोज गडाचा देखील समावेश होतो. यानंतर 11 जून 1670 रोजी मराठ्यांनी हा गड परत जिंकून स्वराज्यात आणला. संभाजीराजांच्या कारकिर्दीत मोगलांचा मानसबदार व जव्हारचा जमीनदार विक्रम पतंगराव याने 7 एप्रिल 1688 रोजी कोहोज गडाचा ताबा घेतला. शेवटी तो इंग्रजांकडे गेला. किल्ल्यावर गेल्यानंतर खरच खूप सुंदर वाटतं. येथील इतिहासाच्या पाऊलखुणा आज ही आपल्याला जाणवतात. माचीवर समोरच शंकराचे जिर्णोद्धारीत मंदिर आहे. त्याच्या समोरच दोन टाकी आहेत, समोरच भग्नावस्थेतील काही मूर्ती आहेत. पुढे गेल्यानंतर किल्ल्याची तटबंदी आहे. एक बुरुज आहे.मारुती रायाचे छोटे मंदिर आहे. बाजूला तीन दगडात कोरलेले पाण्याचे टाके आहेत. दोन टाकीतील पाणी पिण्यायोग्य नाही. एक टाकी आहे त्यात पिण्यायोग्य पाणी आहे. अतिशय थंड आणि आपली तहान भागवणारा पाणी आहे पुढे गेल्यानंतर दोन्ही बाजूला दोन बुरुज आहेत आणि मध्ये पायऱ्या आहेत. हा किल्ल्याचा महाद्वार असावा. पुढे गेल्यानंतर अजून एक मारुतीरायाचे छोटे मंदिर आहे. कालाच्या ओघात किल्ला थोडा ढासळलेला आहे. माथ्यावर वाऱ्या ने तयार झालेले सुळके आहेत. यातील निसर्गनिर्मित माणसाच्या आकाराचा दिसणारा पुतळा ही निसर्गाची अवर्णनीय कलाकृती होती परंतु काळाप्रमाणे ती हि नाहीशी झाली . सध्या कोहोजवरची सर्वात प्रेक्षणीय कोणती गोष्ट असेल तर ती महाराजांचा भास करू देणारी छत्रपती शिवाजींची कलाकृती . विविध दिशांतून विविध आकार व भास दाखवणारी ही कृती पाहून आपण अचंबित होतो.या ठिकाणी उभे राहून हवेचा पुरेपूर आनंद घेता येतो, तसेच पावसाळ्याच्या दिवसांत थंडगार हवेच्या झोताने अंगावर शहारे उभे राहतात. खूप सुंदर असा किल्ला आहे. येथे खूप मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात. तर नक्की या ठिकाणी भेट द्या. # राहण्याची सोय गडावर निवारा असा नाही. शंकराच्या मंदिरात केवळ २ माणसे राहू शकतात. # जेवणाची सोय खाण्याची सोय आपणच करावी, पिण्याचे पाणी गडावर आहे. # पाण्याची सोय बारमाही पाण्याची सोय आहे. # जाण्यासाठी लागणारा वेळ कमीत - कमी २ तास Music used in this video: Music from #Uppbeat (free for Creators!): https://uppbeat.io/t/mood-maze/trendsetter License code: JDECPU4UELK1HPT1 #trekking #first #viral #kohojFort #maharashtratrekking #कोहोजकिल्ला #fristvlog #सह्याद्री #adventure #bhatkanti #marathi #shivajimaharaj Your Queries :- kohoj Kohoj fort Vlog marathi vlog marathi vlogger new vlog Vlogging shelte village Nane village Amgaon Village Waghote Village Galthare village Eco village eco village Galthare kohoj gad Kohoj killa कोहोज किल्ला गडककिल्ले कोकण कोहोज गड कोहोज कोहोज गडावर कसे जायचे कोहोज किल्ला कोहोज किले तक कैसे पहुंचे Kohoj fort history Kohoj trekiing First Time trek Palghar state Kohoj Fort Kohoj killa Kohoj fort palghar Kohoj killa wada Kohoj trek Kohoj camping Kohoj Fort palghar Kohoj fort 2023 Kohoj fort history in marathi Kohoj fort wada How to reach Kohoj fort Kahoj fort kaise jaaye kohoj fort bhul bhulaiya Kahoj fort Kahoj fort trek How to go to Kohoj fort Kohoj fort trek in winters Kohoj gad Kohoj fort waghote ____________________________ 🙏Don't Forget To Subscribe our channel & do turn on bell notifications 🔔 Like ,comment ,Share & Subscribe ___________________________________________ [ THANKS FOR WATCHING THIS VIDEO ]

Comment