MENU

Fun & Interesting

कोल्हापुरी मिरची चा ठेचा | Kolhapuri Mirchi Thecha Recipe | Green Chilli Chutney Recipe In Marathi

S FOR SATISH 62,846 5 years ago
Video Not Working? Fix It Now

कोल्हापुरी मिरची चा ठेचा | Kolhapuri Mirchi Thecha Recipe | Green Chilli Chutney Recipe In Marathi आतापर्यंत तुम्ही वेगवेगळ्या चटण्या पाहिल्या असतील चाखल्या असतील परंतु या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कोल्हापुरी मिरचीचा ठेचा ज्याला महाराष्ट्रात मिरचीचा खर्डा असे सुद्धा बोलतात. कोल्हापुरी मिरचीचा ठेचा महाराष्ट्रात खूप लोकप्रिय आहे. खास करून कोल्हापूर, सांगली, सातारा आणि महाराष्ट्रातल्या बऱ्याच भागात हा मिरचीचा ठेचा जेवणात खाल्ला जातो. या मिरचीच्या ठेच्यापासून वेगवेगळे पदार्थ सुद्धा बनवले जातात जसे खर्डा चिकन वैगेरे आणि त्याची चवपण लाजवाब असते. खोबऱ्याची चटणी, लसणाची चटणी, शेंगदाण्याची चटणी, कांद्याची चटणी, कैरीची चटणी अश्या बऱ्याच चटण्या आपण पाहिल्या परंतु यावेळेस मिरचीचा ठेचा, मिरचीचा खर्डा पाहूया. ग्रामीण ठिकाणी शेतकरी शेतावर जाताना खास हा मिरचीचा ठेचा नेतो. या मिरचीच्या ठेच्यासोबत ज्वारी, बाजरी, तांदळाची वा नाचण्याची भाकरी खाण्याची मजा काही वेगळीच असते. कोल्हापुरी मिरचीचा ठेचा बनवणे अतिशय सोपे आहे, कमीत कमी साहित्य आणि झटपट तयार होणारा मिरचीचा ठेचा तयार करण्यासाठी हिरव्या कोल्हापुरी मिरच्या, शेंगदाणे, लसूण, जिरे, मीठ आणि तेल लागते. खास दगडी खलबत्त्यामध्ये हा मिरचीचा ठेचा आम्ही तयार केला आहे, तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा तयार करू शकता व दगडी पाट्यावरपण तयार करता येतो. #MirchiChaThecha #GreenChutney #ThechaChutneyRecipe #sforsatish गावरान झणझणीत कोल्हापुरी मिरचीचा ठेचा कसा तयार करायचा, मिरचीचा ठेचा खर्डा बनवण्याची पद्धत काय आहे, हिरव्या मिरचीचा ठेचा बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते, मिरची ठेचा तयार करण्याची सोपी पद्धत, गावरान खर्डा कसा बनवतात, हिरव्या मिरचीचा एक चटणीचा प्रकार म्हणजे ठेचा कसा बनवतात हे सर्व पाहण्यासाठी हा कोल्हापुरी मिरचीचा ठेचा बनवण्याचा व्हिडीओ नक्की पहा आणि आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका. आम्ही तुमच्यासाठी असेच आणखी नवनवीन व्हिडीओ घेऊन येत राहू. तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा. @SFORSATISH Follow me on Facebook and Instagram https://www.facebook.com/koknatlamumbaikar https://www.instagram.com/koknatlamumbaikar

Comment