#Aarpaar #आरपार #Firstclassdabadhe #MarathiCinema
भावाबहिणींचं नातं.. कधी मनमोकळ असतं तर कधी ऑक्वर्ड.. कधी टिपिकल असतं तर कधी फॉरवर्ड.. कधी मानलेलं असतं, कधी पोळलेलं असतं, कधी असून नसल्यासारखं असतं तर कधी नसून असल्यासारखं.. आज हेच नातं उलगडण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत..
आजच्या आपल्या खास एपिसोडमध्ये क्षिती जोग, सिद्धार्थ चांदेकर आणि राजसी भावे यांनी मैथिली आणि शिवप्रसाद सोबत भावाबहिणींच्या नात्याविषयी गप्पा मारल्या आहेत.. या गप्पांमध्ये भावाबहिणींच्या नात्याच्या गोड-तिखट आठवणी, समज- गैरसमज आणि भाव भावनांची गोडी यावर सगळ्यांनी आपापले विचार मांडले, आपापले अनुभव सांगितले. एकंदर मजा तर आलीच शिवाय प्रत्येकाच्या व्यक्तिमत्वाची झलक या गप्पांमध्ये दिसून आली, ज्यामुळे या एपिसोडला सुद्धा एक वेगळाच आयाम मिळालाय. त्यामुळे हा एपिसोड शेवटपर्यंत नक्की बघा..