#BolBhidu #KudalwadiChikhali #PuneBulldozer
कुदळवाडी चिखली, साधारण आठवडाभर आधी हा पत्ता पिंपरी चिंचवडच्या बाहेर फारसा चर्चेत नव्हता, पण सध्या हा पत्ता बातम्यांचा विषय आहे, बातम्या फक्त पुण्यात किंवा महाराष्ट्रात होतायत असं नाही, तर बातम्या सगळ्या देशात होत आहेत. कारण काय ? तर इथं होणारी कारवाई. 8 फेब्रुवारीपासून चिखलीच्या कुदळवाडी भागात अनधिकृत बांधकामं आणि अतिक्रमणावर कारवाई सुरु झाली. जवळपास अडीच हजारांपेक्षा जास्त बांधकामं पाडण्यात आली, कित्येक घरं उध्वस्त झाली, कित्येक गोदामं भुईसपाट झाली. कुदळवाडीत फक्त बुलडोझर आणि पोकलेनच फिरत असल्याची दृश्य दिसू लागली.
या दृश्यांची तुलना अनेकांनी गाझा मधल्या विध्वंसाशी केली, ही महाराष्ट्रातलीच नाही, तर देशातली सगळ्यात मोठी बुलडोझर कारवाई असल्याच्या चर्चा सुरु झाल्या. ही कारवाई सुरु असताना हे सगळं धार्मिक द्वेषातून केलं जात आहे, असे आरोप झाले. यामागे बिल्डर लॉबीचा हात आहे का ? महानगरपालिकेला आत्ताच जाग आली का ? अशा टीकाही झाल्या. या कारवाई दरम्यान झालेला एक मृत्यू, घर, नोकरी आणि व्यवसाय गेल्याच्या नागरिकांनी दिलेल्या प्रतिक्रिया यामुळे ही कारवाई चर्चेत आहे. पण पुण्याच्या कुदळवाडी चिखली भागात नेमकं काय घडतंय ? पाहुयात या व्हिडीओमधून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : https://www.facebook.com/BolBhiduCOM
➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu
➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu.com/
➡️Website: https://bolbhidu.com/