#kunkeshwar
श्री क्षेत्र कुणकेश्वर.... कोकणातील एक पवित्र तिर्थक्षेत्र...अतीप्राचीन काळापासुन येथील कणकेच्या राईमध्ये वास्तव्य करुन असलेल्या शंभुमहादेवाची ही भुमी... कणकेच्या बनात असलेला ईश्वर म्हणजेच कुणकेश्वर... देवावरुन गावाचे नाव सुद्धा कुणकेश्वर असेच प्रचलीत झाले.
एका गरीब ब्राम्हणाची गाय दुध कमी देउ लागली. तेव्हा त्याने तिच्यावर लक्ष ठेवले. कुणकेश्वर येथील शंभु महादेवाची पिंडी स्वयंभु असून पूर्वी ती कनक वृक्षांच्या घनदाट अरण्याने वेढलेली होती. ब्राम्हणाची गाय आपल्या मालकाला दूध न देता एका विवक्षित जागी जाउन ती गाय पान्हा सोडत असल्याचे त्याच्या लक्षात आले. त्याने त्या गाईला बेदम जोराचा फटका मारण्याचा प्रयत्न केला.पण गाय निसटून पळाली व त्या प्रहाराचा पाषाणावर आघात झाला आणि त्यातून भ़ळाभ़ळा रक्त येउ लागले. ते पाहून आश्चर्याने भयचकीत झालेल्या ब्राम्हणाची त्या पाषाणावर श्रद्धा बसली. हे स्वयंभू शिवलिंग असल्याची खात्री झाली. त्यानंतर तो ब्राम्हण त्या पाषाणाला शरण गेला व तेव्हापासून तो नित्यनियमाने या पाषाणाची पूजाअर्चा व दिवाबत्ती करू लागला आजही या शिवलिंगावर या घावाची खुण दाखविली जाते.
एक इराणी व्यापारी समुद्रातील वादळात सापडला. आगतिक बनलेला व्यापारी परमेश्वराची करूणा भाकू लागला. तेवढयात त्याला पूर्वेकडे शांतपणे तेवणार्या दिव्याचा प्रकाश दिसला. दिलासा देणार्या त्या नंदादीपाला तो शरण गेला आणि या ठिकाणी मी खूप पैसा खर्चुन जीर्णोद्धार करीन असं त्यानं मनोमन ठरवलं. किनार्यावर सुरक्षित उतरल्यावर तो धावत तिथे गेला. हिंदूंच हे छोटं मंदिर होतं या शिवायलायाचा त्याने जीर्णोद्धार केला.
Surchable content
कुणकेश्वर मंदिर माहिती
Kunkeshwar Mandir history
Kankeshwar Mandir history Marathi
Kunkeshwar Mandir
कुणकेश्वर मंदिर कुठे आहे
Kunkeshwar Mandir devgadh
Video content
कुणकेश्वर यांची सत्यकथा
कुणकेश्वर देव कसे प्रकट झाले
गाय आणि ब्राम्हण संबंध
श्री देवी कुणकेश्वर
श्री देव कुणकेश्वर यात्रा 2025
हे थडगे कोणाचे
अरेबियन व्यापारी ची कथा
हे मंदिर कोणी बांधले
कुणकेश्वर जत्रा 2025