#मटारपराठा #पराठा #पराठारेसिपी #paratha #paratharecipe #recipe #leenajoshi #leenassugrankatta
मटार पराठा
पारीसाठी
गव्हाचे पीठ २ कप
मीठ १ चमचा
तेल १-२ चमचे
सारण
मटार १ कप
कांदा १
आले लसूण मिरची पेस्ट १ टेबलस्पून
तेल २-३ चमचे
जिरे १ चमचा
हळद अर्धा चमचा
तिखट १ चमचा
गरम मसाला १ चमचा
आमचूर अर्धा चमचा
मीठ १ चमचा
पारीसाठी गव्हाच्या पीठात मीठ व तेल घालून कणिक मळून घ्यावी. दहा मिनिटे झाकून ठेवावे.
मिक्सरमधून मटार, कांदा, आले लसूण मिरची पेस्ट घालून वाटून घ्यावे.
पॅनमध्ये तेल घालून ते गरम झाल्यावर जिरे घालावे. मग त्यात मटार चे वाटण घालून परतावे. मग त्यात हळद, तिखट, गरम मसाला, आमचूर व मीठ घालून मिक्स करावे. मिश्रण कोरडे होईपर्यंत परतावे. आता हे मिश्रण वेगळ्या भांड्यात काढून गार करून घ्यावे.
आता कणकेचा एक गोळा घेऊन त्याची पारी करावी व त्यात सारण भरुन पारी बंद करावी. आता हलक्या हाताने पराठा लाटून घ्यावा.
गरम तव्यावर दोन्ही बाजूंनी तूप लावून खरपूस पराठा भाजून घ्या.
गरमागरम पराठे चटणी/दही किंवा सॉस बरोबर खावयास द्यावेत.
Video shooting & editing:
Varun Damle
+91 95459 08040