#दुधीभोपळ्याच्यावड्या #वड्या #खमंगदुधीच्यावड्या #स्नॅक्स #पौष्टिकवड्या #लीनाजसुगरणकट्टा #लीनाजोशी
दुधी भोपळ्याच्या वड्या
कोवळा दुधी ३५० ग्रॅम
गव्हाचे पीठ दीड वाटी
ज्वारीचे पीठ १ वाटी
बेसन ४ टेबलस्पून
बारीक रवा १ टेबलस्पून
तीळ २ चमचे
बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या २
थोडी कोथिंबीर
हळद १ चमचा
तिखट दीड चमचा
मिरपूड १ चमचा
गरम मसाला १ चमचा
हिंग पाव चमचा
धणेपूड १ टेबलस्पून
जिरेपूड १ टेबलस्पून
ओवा अर्धा चमचा
साखर १ चमचा
दही २ टेबलस्पून
मीठ चवीनुसार
फोडणीसाठी :
तेल ४ चमचे
मोहरी, जिरे, बडीशेप, हिंग, १ हिरवी मिरची, कडीपत्ता, तीळ १ चमचा
वरुन घालायला थोडेसे तिखट व चाट मसाला
* दुधीचे साल काढून किसून घ्यावे.
* गव्हाचे पीठ, ज्वारीचे पीठ, बेसन व रवा एकत्र करून त्यात दुधीचा कीस व वरील बाकी सर्व जिन्नस घालून कणिक मळून घ्यावी.
* हाताला तेल लावून या कणकेचे होतील तेवढे उंडे करून घ्यावेत.
* स्टीमर मध्ये पाणी उकळून घ्यावे.
* स्टीमर च्या ताटलीला तेल लावून त्यावर हे उंडे ठेवावेत.
* आता ताटली स्टीमर मध्ये ठेवून वरुन झाकण लावून हे उंडे १० ते १२ मिनिटे वाफवून घ्यावेत.
* नंतर हे उंडे पूर्ण गार झाले की त्याच्या वड्या कापून घ्याव्यात.
* एका पातेल्यात फोडणीसाठी दिलेल्या साहित्याची फोडणी करून घ्यावी. त्यात या वड्या घालून लालसर होईपर्यंत परतून घ्याव्यात. थोडी कोथिंबीर घालावी. वरुन तिखट व चाट मसाला भुरभुरावा. आपल्या मस्त चटपटीत दुधी च्या वड्या तयार आहेत.
*या वड्या तुम्ही तळून पण खाऊ शकता. तसेच जास्तीचे उंडे एअर टाईट डब्यात घालून फ्रीजमध्ये ठेवू शकता.**
Video shooting & editing:
Varun Damle
+91 95459 08040