शाश्वत कोकण विकासासाठी आपला पहिला उपक्रम -
शेतकऱ्यांची जुनी मातीची घरे "मांगर Farmstay" प्रमाणे पर्यटनासाठी विकसित करून प्रत्येक शेतकऱ्याचे स्वतःचे कृषी पर्यटन केंद्र उभे करायला मदत करणे.
पारंपरिक शेती आणि जीवन शैली जपणाऱ्या शेतकऱ्यांना ह्यात प्राधान्यक्रम दिला गेला आहे.
ग्रामीण तरुणांचे होत असलेले स्थलांतर कमी करणे ,पर्यटनातून त्यांच्या जगण्याला प्रतिष्ठा मिळवून, शेती उत्पादनाना चांगला भाव आणि ग्राहक दारात येईल व गावात राहून सन्मानाने चार पैसे मिळवता येतील असा प्रामाणिक उद्देश आहे.