MENU

Fun & Interesting

मोहन भागवतांच्या वक्तव्यावरुन वाद पण Lokmanya Tilak की Mahatma Phule शिवसमाधीचा पुनर्शोध कुणी लावला?

BolBhidu 169,337 5 months ago
Video Not Working? Fix It Now

#BolBhidu #ChhatrapatiShivajiMaharaj #MohanBhagwat राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांचं एक वक्तव्य सध्या चर्चेचा विषय ठरलंय. पुण्यात तंजावरचे मराठे या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात बोलताना मोहन भागवत म्हणाले की, 'इंग्रजांच्या विरुद्ध लढताना सुद्धा शिवाजी महाराज इथेच होऊन गेले, इथे सुद्धा त्यांचं त्या पद्धतीनी स्मरण व्हावं म्हणून जागरण केलं, रायगडावर उत्सव सुरु केला. टिळकांनी ते शोधून काढलं वैगेरे वैगेरे. अशी इथे स्थिती असताना सुद्धा रवींद्रनाथ टागोरांनी शिवाजी महाराजांवर कविता लिहिली.' त्यांच्या या वक्तव्यानंतर रायगडावरची छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी नेमकी कुणी शोधली, याबद्दलचा वाद उफाळून आला. मंत्री छगन भुजबळ, शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे, आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सरसंघचालकांवर टीका केली. छत्रपती शिवरायांची समाधी महात्मा जोतीराव फुले यांनीच शोधून काढली आणि याबद्दल इतिहासकारांमध्येही मतभेद नाहीत, असं या नेत्यांनी सांगितलं. पण त्यानंतर सगळीकडेच चर्चा सुरु झाली की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचा पुनर्शोध नेमका कुणी घेतला ? इतिहास अभ्यासक याबद्दल काय सांगतात ? ऐतिहासिक दस्तावेजांमध्ये कोणते पुरावे आढळतात, समजून घेउया या व्हिडीओमधून. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. http://bit.ly/SubscribeBolbhidu.com ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : https://www.facebook.com/​BolBhiduCOM ➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu ➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu.com/ ➡️Website: https://bolbhidu.com/

Comment