#BolBhidu #Guptadhan #vidarbhanews
अकोला जिल्ह्यातल्या बार्शीटाकळी तालुक्यात जुनी तामशी नावाचं एक गाव आहे. या गावात देशमुखांची गढी आहे, देशमुख कुटुंब काही तिथं राहत नाही. गढीची शानही आता पूर्वीसारखी राहिली नाही. पण १६ सप्टेंबरला म्हणजेच शनिवारी दुपारी या गढीमध्ये स्थानिक लोकांना हालचाल दिसून आली. सोबत एक मशीन घेऊन पाच-सहा माणसं गढीत शिरली होती. हे नेमकं काय करतायत बघायला गावकरी तिथं गेले, गढीच्या मालकांनांही बोलावून घेतलं. जसे गावकरी गढीत पोहोचले, तशी ही टोळी त्या मशीनसकट पळून गेली, त्यांचा डाव फिस्कटला, हा डाव होता गुप्तधन शोधण्याचा.
आता गुप्तधन हा काय एकट्या अकोल्याचा, एकट्या महाराष्ट्राचा विषय नाही. भारतात जिथं कुठं किडेबाज लोकं आहेत, तिथं तिथं गुप्तधनाचे डाव आहेतच. त्यात आमच्या पणज्यानं पुरून ठेवलेले हंडे सापडले, तर पुढच्या सात पिढ्या बसून खातील असं आयटीआयमध्ये नापास झालेलं गाभडं पण कॉन्फिडन्सनं सांगतंय. पण हे गुप्तधन असतंय काय ? याच्या अफवा कशा पसरतात ? आणि गुप्तधन शोधायला नेमकं काय करतात ? पाहुयात या व्हिडीओमधून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : https://www.facebook.com/BolBhiduCOM
➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu
➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu.com/
➡️Website: https://bolbhidu.com/