#BolBhidu #MaharashtraKesari #PruthvirajMohol
मुळशी तालुका, पुणे जिल्ह्याचं वैभव. हिरवळीनं नटलेला, मोठ्ठा इतिहास लाभलेला याच मुळशी तालुक्यात मुठा नावाचं एक गाव आहे. या गावात जाताना एक स्वागत कमान लागते, ज्यावर लिहिलंय स्वर्गीय पैलवान संदीपभाऊ मोहोळ प्रवेशद्वार मुठा. संदीप मोहोळची प्रतिमा बाहेरच्या जगात कुख्यात गुंड म्हणून असली, तरी या गावासाठी संदीप मोहोळ म्हणजे पैलवान संदीपभाऊ. गावातल्या पोरांना कुस्तीसाठी मदत करणारा, स्वतःही कुस्तीचं मैदान गाजवणारा. या गावातल्या प्रत्येक मुलाला एका गोष्टीचं प्रचंड आकर्षण कुस्ती. कारण इथल्या मातीत कुस्ती होती, इथल्या मातीत कुस्ती आहे आणि असेलही.
स्वर्गीय मामासाहेब मोहोळ यांच्यापासून या कुस्तीचा इतिहास सुरु होतो, या इतिहासाचा वर्तमान आहे महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळ. पृथ्वीराज महाराष्ट्र केसरी झाल्यावर वादाची किनार चर्चेत आली, तसंच पृथ्वीराजचं एक वाक्य सुद्धा, 'मी माझ्या वडीलांचं स्वप्न पूर्ण केलं.' मोहोळ कुटुंबानं पाहिलेलं हे स्वप्न होतं काय ? मुळशीच्या मुठा गावातल्या मोहोळांचा इतिहास आणि कुस्तीची परंपरा नेमकी कशी आहे ? पाहुयात या व्हिडीओमधून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : https://www.facebook.com/BolBhiduCOM
➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu
➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu.com/
➡️Website: https://bolbhidu.com/