#maharashtra #marathi #zadipatti #theater #BBCMarathi
पूर्व विदर्भाला झाडीपट्टीचा प्रांत म्हणतात आणि या झाडीपट्टीची विशेष ओळख म्हणजे इथे गावागावात होणारी नाटकं. गडचिरोलीतील कुरुड या गावात रात्रभर रंगलेल्या नाटकांना आम्ही हजेरी लावली. झाडीपट्टीच्या नाटकांचं अर्थकारण समजून घेतलं. झाडीपट्टी रंगभूमीला साधारण 140 वर्षांचा इतिहास आहे, तो म्हणजे विदर्भाची नाट्यपंढरी समजल्या जाणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यातील नवरगावमुळे. 1885 मध्ये पहिल्यांदा झाडीपट्टीतील या गावात नाटक सुरु झालं. व्यंकटेश नाट्य मंडळाच्या माध्यमातून बालाजी पाटील बोरकर, भाऊजी जोशी बंधू यांनी यासाठी तेव्हा पुढाकार घेतला. तेव्हापासून या प्रांताने रंगभूमीत आपलं योगदान दिलं आहे.
रिपोर्ट- अविनाश पोईनकर
शूट- हेमंत एकरे
व्हीडिओ एडिट- अरविंद पारेकर
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 https://whatsapp.com/channel/0029Vaa8TxTIyPtQpqWBTh3j
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
https://www.facebook.com/bbcnewsmarathi/
https://twitter.com/bbcnewsmarathi