👉 #कोकणातील_भजन
🎵🎶🎹
भजन म्हणजे भक्ती. या भक्तीत एकरूप होण्यासाठी टाळ-मृदंगाच्या साथीने रंगून जाणं, ही कोकणची खासियत. गणेशोत्सवात तर या भजनांना अधिकच रंग चढतो. गणेशोत्सवाच्या रात्री भजनाच्या साथीने सजतात, जागविल्या जातात. महिनाभर आधीच नवी गाणी, नवी बारी बसवण्यासाठी भजन मंडळांची तयारी सुरू होते. तबला, मृदंग सजवणार्या कारागिरांची लगबगही वाढते. चतुर्थीच्या रात्री गॅस बत्तीच्या उजेडात टाळ-मृदंगासह भल्या मोठ्या पायपेटीचं ओझं घेऊन लगबगीनं वावरणारी भजनी मंडळं बघितली की, या भजन कलेबद्दल अप्रूप वाटायला लागतं. कोकणात प्रत्येक वाडीवर आता भजनी मंडळं असतात. गावातील माहितगाराच्या मार्गदर्शनाखाली किंवा बाजारात येणार्या मान्यवर बुवांच्या कॅसेट ऐकून आपल्या भजन बार्या बसवल्या जातात.
मध्यंतरीच्या काळात काहीशी मागे पडलेली भजन कला आता वाढत्या स्पर्धांमुळे पुन्हा एकदा प्रकाशझोतात आली आहे. ही कला आता व्यावसायिक रूप घेत आहे. पूर्वी केवळ चतुर्थीतच ऐकू येणारी भजन बारी आता वर्षभर विविध कार्यक्रमांची रंगत वाढवताना दिसते. आता तर भजन कलाकार संघटितही होऊ लागले आहेत. कालानुरूप चित्रपटातील गाण्यांमध्ये बदल घडत गेले तरी पूर्वापार चालत आलेला भजनी साचा तसाच राहिला आहे. गण, स्तवन, नोटेशन रूपकामधला गजर, अभंग, गौळण, कव्वाली किंवा भारूड आणि शेवटचा गजर असं भजनाचं रूपडं तर गाणं म्हणणारा बुवा, मृदुंगमणी, चक्कीवाला (तालरक्षक) कोरस अशी भजनी मंडळी! 'जय जय राम कृष्ण हरी'ने सुरू झालेलं, उत्तरोत्तर कव्वाली, गजरात रंगत जाणारं भजन ऐकून मन तल्लीन होतं.
भजन आनंदात तसंच दु:खातही केलं जातं. अर्थात प्रसंगानुरूप त्यात बदल होतो. चतुर्थीतील भजनी बारीत गणेश-शंकराच्या गाण्यांचा भरणा असतो तसा वार्षिक मांडांवरील सदरेवरही याच भजनाचा गजर होतो. पूर्वीच्या . संध्याकाळी ७च्या दरम्यान सुरू झालेले भजनी मेळे सकाळी ६ वाजेपर्यंत सुरू असतात. तहान भूक विसरून भाविक तल्लीन होतात. उसळ, बुंदीचे लाडू, एकूणच काय आनंद आणि उत्साहाचे उधाण घेऊन आलेल्या या सणामुळे कोकणची भजन पर कित्येक वर्षे तग धरून आहे.
@durvasgurav4407
@RK_OFFICIAL15
#कोकण
#अभंग
#भजन
#kokan
#dabalbari
#subscribe
#viral
#bappamorya