✅👨🌾नमस्कार शेतकरी मित्रांनो ! 🙏
कृषि डॉक्टर🌽 या मराठी यूट्यूब चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे.👍
शेतकरी मित्रांनो नमस्कार, तुम्हा सर्वांच पुनः स्वागत आहे कृषि डॉक्टर परिवारामध्ये. तुम्हाला तर माहीत आहे, की मका हे पीक म्हणल की लष्करी आळी आलीच. आणि लष्करी आळी म्हणल की भरमसाठ कीटकनाशकांच्या फवारण्या देखील आल्या. परंतु बऱ्याच वेळा आपल्याला खूप साऱ्या फवारण्या घेऊन देखील मका पिकावर लष्करी आळी नियंत्रनामध्ये म्हणावे असे यश मिळत नाही. म्हणूनच शेतकरी मित्रांनो आपण आज पाहणार आहोत की कश्या प्रकारे आपण या लष्करी आळीचे एकात्मिक पद्धतीने नियंत्रण करू शकतो आणि खूप कमी पैशीमध्ये खूप चांगल्या प्रकारे रिजल्ट प्राप्त करू शकतो. चला तर मग वेळ न घालवता सुरू करूया -
अ) लष्करी आळीचा प्रादुर्भाव कमी असताना -
1. पेरणी अगोदर खोल नांगरट करणे.
2. पिकाची फेरपालट करावी.
3. अंतर पीक पद्धतीचा अवलंब करावा.
4. सापळा पिकाची लागवड करावी . ( नेपियर गवत )
5. पक्षी थांबेलावावेत ( एकरी 10 )
6. कामगंध सापळे लावावेत ( एकरी 5 )
7. लष्करी आळीच्या नैसर्गिक शत्रूचे संवर्धन करावे
परभक्षी ( ढालकिडा )
परजीवी ( ट्रायकोग्रामा )
ब) प्रादुर्भाव जास्त वाढल्यानंतर फवारणी वेळापत्रक -
अ - प्रतिबंधात्मक -
1. निंबोळी अर्क ( 5% ) - 2 मिलि
2. अझाडीरॅक्टिन - ( 1500 ppm ) - 2 मिलि
ब - निवरात्मक -
1. थायामेथोक्सम १२.६% + लॅम्बडा सायहॅलोथ्रिन ९.५% झेडसी ( अलिका , Synzenta ) - 0.5 मिलि
2. स्पिनेटोरम 11.7% SC ( लार्गो , धानुका ) - 0.9 मिलि
3. क्लोराँट्रानिलिप्रोल 18.5% SC ( कोराजन , एफएमसी ) - 0.4 मिलि
क) काही महत्वाच्या सूचना -
1. फवारण्या ह्या शक्यतो सकाळी लवकर किंवा सायंकाळी 4 नंतर घ्यावा.
2. वरील कीटकनाशकांचे प्रमाण हे 1 लीटर पाण्यासाठी आहे.
3. फवारणीसाठी पानी हे अनुकूल ph चे घ्यावे. ( 6.5 ते 7.5 )
4. फवारणी करताना वाऱ्याचा वेग जास्त नसू नये.
5. फवारणी करताना मातीमध्ये ओलावा असावा.
6. फवारणी मिश्रण ( द्रावण ) तयार करताना त्यामध्ये स्टीकर अवश्य मिसळावे.
7. आणि फवारणीमध्ये विनाकारण एकापेक्षा जास्त घटक मिसळू नये.
अश्या प्रकारे शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर तुमच्या मका पिकाचे नियोजन केले तर तुम्ही देखील खूप चांगल्या प्रकारे कमी उत्पादन खर्चासह मका पिकावर येणाऱ्या लष्करी आळीचे नियंत्रण करू शकता. शेतकरी मित्रांनो दिलेली माहिती हा लेख तुम्हाला कसा वाटला आम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. आणि ही माहिती जर तुम्हाला खरंच आवडली असेल तर तुमच्या इतर केळी उत्पादक शेतकरी मित्रासोबत शेअर करायला देखील विसरू नका. चला तर भेटूया अशाच एका विषयासह तूर्तास धन्यवाद .
✅संपर्क -
📱What's App:- 9168911489 ☎️
📱Mail id:- [email protected]
✅आमचे इतर सोशल मीडिया अकाऊंट -
1️⃣Linked In - https://www.linkedin.com/in/krushidoctor/
2️⃣Twitter - https://twitter.com/KrushiDoctor
3️⃣Website - www.krushidoctor.com
4️⃣Youtube - https://www.youtube.com/c/KrushiDoctor
5️⃣Facebook - https://www.facebook.com/krushidoctorofficial
6️⃣Instagram - https://www.instagram.com/krushi_doctor_official/
#agriculture #krushidoctor #farming #crop #sheti #कृषिडॉक्टर #कृषिडॉक्टरसूर्यकांत #krushidoctorsuryakant #lagwad #लागवड