MENU

Fun & Interesting

Making Of Title Song | Tu hi Re Majha Mitwa | Star Pravah | Nilesh Moharir | Hrishikesh | Sugandha

Nilesh Moharir Official 34,359 3 weeks ago
Video Not Working? Fix It Now

Here is the song making video of Star Pravah's latest marathi show 'Tu Hi Re Majha Mitwa', featuring Abhijit Amkar & Sharvari Jog. The title track has been written by Rohini Ninave, composed by Nilesh Moharir & rendered by the talented vocalists Hrishikesh Ranade & Sugandha Date. स्टार प्रवाह’ वाहिनीवर ‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत’, ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ या दोन नव्या मालिकांपाठोपाठ आणखी एक मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या मालिकेचं नाव आहे ‘तू ही रे माझा मितवा’. या नव्याकोऱ्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला शर्वरी जोग आणि अभिजीत आमकर यांची फ्रेश जोडी दिसत आहे. ह्या मालिकेचे शीर्षक गीत लिहिले आहे रोहिणी निनावे ह्यांनी तर त्याला स्वरबद्ध केले आहे निलेश मोहरीर ह्यांनी. ह्रिषीकेश रानडे व सुगंधा दाते ह्यांच्या आवाजात ध्वनिमुद्रित होतानाचे काही क्षण ह्या विडिओ मध्ये बघा आणि आम्हाला कमेंट करून सांगा तुम्हाला कसं वाटलं. Music Credits :- Lyrics - Rohini Ninave Music Nilesh Moharir Singers - Hrishikesh Ranade, Sugandha Date Music Production - Nilesh Moharir Additional Programming & Guitar - Vikram Bam Recorded by Aishwarya & Kalpesh at Ajivasan Sounds Mixed & Mastered by Ajinkya Dhapare at The Sonic Station Courtesy - Tell-A-Tale Media & Star Pravah प्रेम कुणाचे नाही कुणावर प्रेम असे आभासच केवळ प्रेम असावी एक कल्पना प्रेम मनातील व्यर्थ भावना सोडूनी अर्ध्यावर जाते कोणी कुणा आठवांच्या उरती छाळणाऱ्या खुणा तरी ही चाहूल गोड़ कुणाची ह्या जिवास ओढ लावी का नाव कुणाचे घेता ही रात दरवळून यावी ह्या मनात रुजलेला कुणाचा गोडवा... तू ही रे माझा मितवा मनातून जात नाहीस तू कितीही दूर जाण्याने तुझ्याशी भेट होई पुन्हा कुठल्याशा बहाण्याने तुझ्यावर प्रेम नाही तरी बघते वाट का तुझी दिसता चेहरा तुझा मी न राहते माझी तुझ्या मोहक हसण्याने या मनी वाजे अलगूज त्या धुंद आठवांची कानामधे कुजबूज हा खेळ या मनाला वाटे का हवा... तू ही रे माझा मितवा

Comment