श्री मलंग गडाचा थरार | Malang Gad
#चिखलघाम आणी सह्याद्री ! #malanggad #trekking #marathivlog #marathiyoutuber #forts #trekkingvlogs #zunzarmachi
महाराष्ट्राचा इतिहास हा इथल्या भूगोलाशिवाय अपूर्णच आहे, याची साक्ष इथले गडकोट पाहताना प्रत्यक्षात येते. आपल्या भौगोलिक स्थानामुळे कधीकाळी बुद्धिबळाचा खेळ जिथे रंगला असा इंग्रज मराठे युद्धातला साक्षीदार म्हणजे श्री मलंग गड,
मच्छिन्द्रनाथांच्या नावाने प्रसिद्ध असलेला मलंगगड हा किल्ला शिलाहार राजाने बांधला. कल्याण पासून हाकेच्या अंतरावर, पनवेलच्या सीमेवर असणारा हा किल्ला बोरघाट, भीमाशंकर व माळशेज घाट वाटांवर नजर ठेवण्यासाठी अगदी महत्वाचा. मुंबई, कल्याण आणि पनवेल पर्यंतच्या महत्वाच्या परिसरावर नजर ठेवण्यासाठी मोक्याच्या जागी असलेली याची जमेची बाजू. गडाचे मुख्यतः तीन भाग, पिरमाची, सोनेमाची आणि बालेकिल्ला.
मलंग गडाच्या भूगोला बरोबरच इतिहासही रंजक आहे. इंग्रज मराठा युद्धातला महत्वाचा युद्धपट मलंगगडाच्याच सानिध्यात रंगला होता. १७८० मध्ये इंग्रजांनी गडाला वेढा घातला, गडावर फक्त ३०० मावळे. इंग्रजांनी मग पीरमाची वर ताबा मिळवला, तोफा चढवल्या आणि सोनेमाचीवर हल्ला केला. पण किल्ल्याच्या भौगोलिक स्थानामुळे आणि गच्च रानामुळे मराठ्यांना इथल्या अनेक चोरवाटा माहित होत्या. त्यामुळे त्यांचा बाहेरच्या जगाशी संपर्क तुटण्याचा संभव नव्हता.
मग सुरु झाला शह काटशहाचा खेळ, अशाप्रकारे मराठ्यांनी अखेरपर्यंत मलंगगड शर्थीने लढवला. मलंगगडाचा इतिहास खरंच रंजक आणि रोमहर्षक आहे, म्हणूनच समजावून घेण्यासारखा आहे.
आज मात्र किल्ला बकालीच्या विळख्यात सापडला आहे. जागोजागी कचऱ्याचे, प्लास्टीकचे ढीग दिसतात. भटकी जनावरं मोकाट फिरताना दिसतात. एका दैदित्यमान इतिहासाचा साक्षीदार, उपेक्षेच्या गर्तेत सापडलाय.
इंग्रज मराठा युद्धात मराठ्यांच्या पाडावानंतर इंग्रजी सैन्याची तुकडी, तोफांचा आणि सुरुंगांचा भडीमार करत किल्ले उध्वस्त करत महाराष्ट्रभर फिरत होती. मराठ्यांच्या किल्ल्यांची अक्षरशः धूळधाण झाली.
त्यातून इथल्या पायऱ्याही सुटल्या नाहीत, मग हा संपूर्ण कडा सुरुंग लावून फोडण्यात आला आणि गडावरचे रहाळ मोडण्यात आले.
पण पुढचा कडा आम्हाला म्हणत होता, थरार अभि बाकी है मेरे दोस्त. तसंच मग म्होरल्या अंगाला असलेल्या कातळ भिंतीशी दोन हात करायचे होते. इथली चढाई सुद्धा थरारकच म्हणण्या जोगी, दोन्ही बाजूला खोल दरी, निमुळत्या भिंतीच्या सोंडेवरून खोदीव पायर्यांच्या आधाराने सावकास दोन्ही हात खोबण्यांमध्ये गच्च बोटं रुतवून, कातळ छातीशी कवटाळून, अलगद वर चढायचं.
या बेलाग कातळ भिंतीवर आपल्या पूर्वजांनी जर पायऱ्या खोदल्या नसत्या तर इथून वर फक्त वाराच चढू शकतो आणि खळाळतं पावसाचं पाणीच उतरू शकतं. पण मराठे चढलेही, राहिलेही, आणि उतरलेही.
I wish you a wonderful day and ....... I will meet you on Instagram ►
https://www.instagram.com/ran_kida/
---------------------------------------------------------------------------------------------------
#maharashtra #viral #marathi #maratha #marathaempire #shivajimaharaj #shivaji #sahyadri #sahyadrimountains #trekkinglovers #trekkersofmaharashtra #waterfall #rural #akole_sangamner #kalyan #thane #panvel #navimumbai #mumbai #pravasvarnan #harishchandragad #kalsubai #ratangad #wildlife #nature #naturelovers #rain #jangal #viralvideo