राजमाची हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. पुणे-मुंबई महामार्गावर खोपोली व लोणावळा दरम्यान हा किल्ला सहजगत्या दिसतो. भारत सरकारने या किल्ल्याला दिनांक २६ एप्रिल, इ.स. १९०९ रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे.
गडावर जाण्याच्या वाटा
पायी लोणावळ्याहून तुंगार्ली मार्गेः लोणावळ्याहून तुगांर्ली मार्गे राजमाची गावात पायी जाता येते. ही वाट एकदंर १५ कि.मी लांबीची आहे.वाटेने किल्ल्यावर जाण्यास ३ ते ४ तास लागतात.
पायी कर्जतहून कोंदीवडे मार्गेः कर्जतहून कोंदीवडे या गावात बसने किंवा गाडीने यावे. कोंदिवडे येथून खरवंडी मार्गे किल्यावर जाणारी पाउलवाट उभ्या चढाची आहे. किल्यावर पोहोचण्यास सुमारे ३ तास लागतात.
गाडी मार्ग : लोणावळा किंवा खंडाळा येथून कुणेगाव - फणसराई मार्गे गडावर मोठी चारचाकी किंवा दुचाकी गाडीने उधेवाडी ह्या गडाच्या माचीवर वसलेल्या गावात पोहोचता येते. हा मार्ग कच्चा मातीचा असून काही ठिकाणी थोडे डांबरीकरण केलेले आहे. तसेच ओढ्यांवर पुलही बांधण्यात आलेले आहेत.
सैराट मधील सुप्रसिद्ध कलाकार आज आपल्या सोबत आहेत
तानाजी गळगुंडे हे मराठी चित्रपटसृष्टीत काम करणारे भारतीय अभिनेता आहेत. २०१६ च्या सैराट या मराठी रोमँटिक चित्रपटातील प्रदीप "लंगड्या" बनसोडे मधील त्यांच्या प्रमुख भूमिकेसाठी ते ओळखले जातात. यांनी अमिताभ बच्चन स्टारर हिंदी चित्रपट झुंड मध्ये देखील काम केले आहे. घर बंदूक बिर्याणी, माझा अगडबम, फ्री हिट दणका, एकदम कडक, अश्या अनेक चित्रपटांमध्ये काम करून चित्रपट श्रुष्टीत स्वतःच अस्तित्व निर्माण केला आहे.
सध्या मान्सून सिझन सुरु झाला आहे। आणि याच सिझन मध्ये आपल्या सह्याद्रीच सुंदर रूप दाखवण्यासाठी आज आपण तानाजी भाऊला घेऊन चाललो आहोत सह्याद्रीत । याचा पूर्ण विडिओ आपल्या चॅनेल वर आला आहे । नक्की सगळ्यांनी बघा आणि जास्तीत जास्त share करा