#BolBhidu #Infosys #MysoreInfosys
आयटी कंपनीमध्ये काम करतोय म्हणजे निवांत, लाईफ सेटल, जरा शिका याच्याकडून, टिपिकल ठरलेली वाक्य. पण तुमचा एखादा मित्र आयटी कंपनीमध्ये काम करत असेल, तर त्याला सध्या हे प्रश्न विचारून बघा, तो तुमच्यासमोर प्रॉब्लेम्सची यादी वाचून दाखवेल. तशी प्रॉब्लेम्सची लिस्ट आपण पण त्यांच्या तोंडावर मारू शकतो, पण मग ते लेऑफचा विषय काढतील आणि आपल्याला थंड घ्यावं लागेल. कारण सध्या आयटी कंपनीमध्ये लेऑफचा सिन फार डेंजर सुरु आहे. २०२५ सुरु होऊन फक्त तीनच महिने झालेत, पण कंपन्यांमधून कर्मचाऱ्यांना काढून टाकल्याच्या बातम्या हेडलाईनचा विषय ठरतायत. भारत असो किंवा बाहेरच्या देशातल्या कंपन्या हजारो लोकांना लेऑफमुळे नोकऱ्या गमवाव्या लागल्यात. भारतात दुसऱ्या नंबरची आयटी कंपनी म्हणून ओळख आहे इन्फोसिसची. तीच तीच वो ७० घंटे वाली कंपनी. त्यांनी फेब्रुवारीत जवळपास ४०० ट्रेनी कर्मचाऱ्यांना कंपनीतून काढून टाकलं होतं.
म्हैसूर कॅम्पसमधून इतक्या मोठ्या संख्येने कंपनीनं कर्मचाऱ्यांना काढून टाकल्यामुळे वाद झाला. अनेक कर्मचारी संघटना आक्रमक झाल्या, त्यांनी या विरोधात कंपनीवर कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी केली. सरकारपर्यंतही हे प्रकरण पोहोचलं. या घटनेला काहीच दिवस झाले असताना आता इन्फोसिसने पुन्हा एकदा म्हैसूर कॅम्पसमधूनच काही कर्मचाऱ्यांना काढण्याचा निर्णय घेतलाय. मात्र यावेळी कंपनीने या कर्मचाऱ्यांना दुसरा एक पर्याय दिला असल्याचंही सांगण्यात येतंय. इन्फोसिसने नेमका काय पर्याय दिलाय ? आणि मागच्या वेळचं इन्फोसिस लेऑफ प्रकरण नेमकं काय होतं? या दोन महिन्यात त्या ४०० लोकांबाबत काय निर्णय झाला का ? तेच जाणून घेऊयात या व्हिडिओमधून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : https://www.facebook.com/BolBhiduCOM
➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu
➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu.com/
➡️Website: https://bolbhidu.com/