नाचणीचे आंबील Nachaniche Ambil | तुम्ही नाचणी आंबील कधी बनवले आहे का? (Konkan) कोकणात नाचणी हे पीक चांगलं येतं. नाचणीच्या भाकऱ्या, घावणे बनवले जातात तसेच या नाचणीच्या पिठाचे आंबील सुद्धा बनवले जाते. नाचणीचे आंबील शरीराला अतिशय पौष्टिक आहे, यामध्ये कॅल्शियम, कर्बोदके, लोहयुक्त नाचणी खूप फायदेशीर आहे. नाचणीचे आंबील उन्हाळ्यात पोटाला थंडावा देतं. हे नाचणीचे आंबील बनवण्याची पद्धत सुद्धा अतिशय सोप्पी आहे. घराच्या घरी कमी साहित्यात हे नाचणीचे आंबील उन्हाळ्यात बनवा तुम्ही घरी आणि आपली रोगप्रतिकारक शक्ती या नाचणीच्या आंबील ने वाढणार आहे. नाचणीला रागी (Ragi Malt) असे पण म्हणतात. #NachanicheAmbil #NachaniAmbil #KonkaniFood #sforsatish
नाचणीचे आंबील हे पाचक, रुचकर असते. आंबील वरीचे पण बनतात पण हे नाचणीचे आंबील खूप चविष्ट लागते. नाचणीचे आंबील बनवण्यासाठी जास्त साहित्य लागत नाहीत. मिरची, दही, आलं, लसूण, कोथिंबीर, मीठ घालून हे अगदी झटपट आंबील तयार होते. हे नाचणीचे आंबील झटपट कसे तयार करायचे हे पाहण्यासाठी हा व्हिडीओ नक्की पहा. व्हिडीओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका!
Follow me on Facebook and Instagram
https://www.facebook.com/koknatlamumbaikar
https://www.instagram.com/koknatlamumbaikar