राणेंच्या आडून खेळणारा खिलाडी मॅच फिक्सिंगच्या तयारीत! शिंदेंना पक्की टीप मिळाली फुटणारे १५ आमदार आपलेच? Narayan Rane | Eknath Shinde |
भाजप श्रेष्ठींकडून काही तरी मोठी टीप मिळाल्याशिवाय केंद्रीय मंत्री नारायण राणे उगाच स्वबळाची भाषा बोलतील असं वाटत नाही. महादेव जाणकर, बच्चू कडू यांचं भाजपनं काय केलं, हे सर्वांना माहित आहेच. भाजपचा इतिहास बघता शिंदेंनी हा विषय गांभीर्यानं घ्यायला हवा. आज आपण सुपात असलो तरी, उद्या जात्यात जाणार आहोत, आपला ठाकरे होणार नाही, याची काळजी एकनाथ शिंदे आणि कंपनीनं घ्यायला हवी. शिंदे आणि अजित पवारांना गाफील ठेवून भाजप स्वबळाची लिटमस टेस्ट करतेय का, अशी शंका घ्यायला वाव आहे. धनंजय मुंडे, संजय राठोड, संजय शिरसाट अशा या मित्रपक्षांच्या नेत्यांनी भाजपला अडचणीत आणलंय. शेवटी सत्तेतील वाटेकरी असल्यानं भाजपनं कितीही ठरवलं तरी, या नेत्यांवर कारवाई करायला मित्रपक्षांची अडचण ठरतेच. त्यामुळे मित्रपक्षांची झंझट न ठेवता स्वबळावरच भाजप सत्तेत येउ शकतेय का, याची आता चाचपणी सुरु झाली आहे. त्याचाच एक भाग म्हणून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी 15 आमदार संपर्कात असून स्वबळाची भाषा केली आहे. त्याचाच घेतलेला हा आढावा….
#eknathshinde #narayanrane #devendrafadnavis #ajitpawar #bjp #shivsena #politics