#bbcmarathi #Zerotillagefarming #maharashtrafarmers
औरंगाबाद जिल्ह्यातल्या बोदवडचे शेतकरी गणेश गव्हाणे एसआरटी म्हणजेच विनामशागतीचं तंत्रज्ञान वापरून शेती करत आहेत. अशी शेती ज्यात शून्य मशागत असते. म्हणजे नांगरणी, निंदणी, वखरणी, कोळपणी असं काहीही करावं लागत नाही. 2019 साली त्यांनी दोन एकरच्या प्लॉटवर याप्रकारच्या शेतीसाठीचा प्रयोग केला.
विनामशागतीच्या शेतीतून उत्पन्न वाढतंय असं दिसल्यावर गणेश यांनी यंदा 9 एकर क्षेत्रावर एसआरटी पद्धतीनं कपाशी आणि मका या पिकांची लागवड केलीय. आता राज्यातील 6 हजार एकर क्षेत्रावर विनामशागतीचं तंत्र वापरून भात, कापूस, सोयाबीन, मका, हरभरा, गहू, झेंडू अशा वेगवेगळ्या पिकांची लागवड करण्यात आलीय. पण ही शेती नेमकी कशी केली जातेय?
रिपोर्टिंग – श्रीकांत बंगाळे
कॅमेरा – गणेश वासलवार
एडिटिंग – अरविंद पारेकर
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
https://www.bbc.com/marathi/podcasts/p0b1s4nm
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
https://www.facebook.com/bbcnewsmarathi/
https://twitter.com/bbcnewsmarathi