#BolBhidu #MaharashtraEducationNews #NewPolicyForSchool
मागील वर्षी केंद्र सरकारने नवीन शैक्षणिक धोरण लागू केलं, त्याच पावलावर पाऊल ठेवत आपल्या राज्यात सुद्धा नवीन शैक्षणिक धोरण आणलं जातंय. या नवीन धोरणानुसार राज्य सरकारने इयत्ता तिसरी ते बारावीच्या शालेय अभ्यासक्रमात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार, 'एससीईआरटी'ने राज्याचा शालेय अभ्यासक्रम आराखडा बदलणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. राज्याच्या शालेय आणि कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षणाची दिशा ठरवणारा राज्य अभ्यासक्रम आराखडा जाहीर झाला असून मे महिन्यात यासंदर्भातील मसुदा जाहीर करण्यात आला होता. याच धोरणाचा एक भाग म्हणून राज्यातील शाळांच्या वार्षिक वेळापत्रकात मोठा बदल करण्यात येणार असून 'सीबीएसई' प्रमाणे त्याची आखणी करण्याची शिफारस करण्यात आली आहे. या शिफारसीला मान्यता मिळाल्यास पुढील वर्षापासून राज्यातील सर्व शाळांचे शैक्षणिक वर्ष १५ जून ऐवजी 1 एप्रिलपासून सुरू होऊ शकते.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार तयार केलेल्या राज्य अभ्यासक्रम आराखड्यानुसार वर्षभरातील राष्ट्रीय-राज्य सुट्ट्या, सत्र सुट्टी, अन्य सुट्या विचारात घेतल्यानंतर २३४ दिवस कामकाज अपेक्षित आहे. त्यामुळे शाळांचा एकूण कामकाजाचा वेळ वाढणार असून, हे कामकाज पूर्ण करण्यासाठी सुट्या कमी कराव्या लागण्याची शक्यता आहे. त्याबाबतचे संकेत राज्य अभ्यासक्रम आराखड्यात देण्यात आले आहेत. म्हणून १ एप्रिल ही तारीख सामोर येतेय. संपूर्ण विषय काय आहे ते समजून घेऊ.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : https://www.facebook.com/BolBhiduCOM
➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu
➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu.com/
➡️Website: https://bolbhidu.com/