MENU

Fun & Interesting

Nisargabhaan I Aakar Jeevanala : Audio Book I Special Episode I Dileep and Poornima Kulkarni

Nisargabhaan Nashik 6,814 5 years ago
Video Not Working? Fix It Now

कोरोना वैश्विक महामारीच्या निमित्ताने किमान गरजांच्या आधारे आपण सर्वच जण मागील दीड - दोन महिने राहत आहोत. अशा अनुभवातूनच अनेक जण साध्या राहणीमानाचा पुरस्कार करतांना दिसतात. साधारण तीन दशकापूर्वी जागतिकीकरणाबरोबर जी पिढी जन्माला आली तिने आज गृहस्थाश्रमात प्रवेश केला आहे. आर्थिक संपन्नतेच्या वातावरणात वाढलेल्या या मध्यम वर्गीयातील या पिढीसाठी गरज आणि चैन यामधली रेषा फार धूसर असल्यामुळे त्यांना जरी शाश्वत जीवनशैलीची स्वप्न पडत असली तरी त्यादिशेने जाणारी वाट कुठली याची जाणीव बहुतेकांना नाही. याच स्वप्नाचं तंत्र उलगडून दखवणाऱ्या “आकार जीवनाला” या श्री दिलीप व सौ पौर्णिमा कुलकर्णी लिखित लेखमालेचे अभिवाचन नाशिकच्या निसर्गभान गटातर्फे या निमित्ताने केले गेले. ही श्रवणमाला दि. १० मे ते १५ मे २०२० या कालावधीत सलग सहा दिवस क्रमशः प्रसारित झाली. या वाचनमालेचा शेवट श्री दिलीप व सौ पौर्णिमा कुलकर्णी यांच्या या विशेष संवादाद्वारे तसेच श्रोत्यांच्या निवडक प्रश्नोत्तरांद्वारे केला गेला आहे. निसर्गभान या गटाशी आपण [email protected] या ई-मेल वर अथवा ९४०५६९८७२८ या WhatsApp क्रमांकावर संपर्क साधू शकता. निसर्ग भान: आज सर्वत्र निसर्ग विरुद्ध माणूस अशी रस्सीखेच चालू असताना या दोन्हींमध्ये समन्वय साधण्यासाठी निसर्गाचे भान आपल्या प्रत्येक कृतीत असले पाहिजे या विचाराने प्रेरित होऊन, विविध व्यावसायिक क्षेत्रात स्वतःचे योगदान देणारे आम्ही काही मित्र एकत्र आलो निसर्गभान या नावाने. निसर्ग अभ्यासक, संशोधक, संवर्धक आणि प्रेरक अशी या गटातील सदस्यांची थोडक्यात ओळख. निसर्गभान गटातर्फे निसर्गस्नेही जीवनशैली समजून घेण्याच्या दृष्टीने नैसर्गिक प्रक्रिया आणि त्यावर होणारा मानवी हस्तक्षेपाचा परिणाम याचा अभ्यास केला जातो. निसर्गभान तर्फे शाश्वत जीवनशैली अभ्यासक्रम राबविला जातो. त्याबरोबरच क्षेत्रभेटी, व्याख्यानं, गट चर्चा या माध्यमातून पर्यावरण प्रश्नांवर सर्वसामान्यांमध्ये जाणीव – जागृती केली जाते. For more updates visit: Facebook - https://bit.ly/2YHhvLm SOLO ACOUSTIC GUITAR by Jason Shaw http://freemusicarchive.org/music/Jas... Creative Commons — Attribution-ShareAlike 3.0 Unported— CC BY-SA 3.0 Free Download / Stream: https://bit.ly/_solo-acoustic-guitar Music promoted by Audio Library https://youtu.be/4M9Puanhdac

Comment