Official Video | माझ्या बायकोन उपास धरला | Majhya Baykon Upas Dharla | Sajan Bendre | SK Brothers
Official Video | माझ्या बायकोन उपास धरला | Majhya Baykon Upas Dharla | Sajan Bendre | SK Brothers
Audio Credit
निर्माता - मंगलताई जाधव
गायक - साजन बेंद्रे
गीत - साजन बेंद्रे
संगीत - कुलदीप सचिन
रेकॉर्डिंग स्टुडिओ - SK STAR Recording Studio
Instagram I'd Follow Now 👇
https://www.instagram.com/kuldip_sk?igsh=MXhjZXJwb2xidHlkNw==
https://www.instagram.com/sk_star_music_official?igsh=OHN2b3c0M2lqN3R1
Video Credit
दिग्दर्शन - विजयराज महादेव अडागळे
कलाकार - अमोल महादेव अडागळे
नुपूर
DOP - विशाल पांढरे
प्रोडक्शन मॅनेजर - आकाश गायकवाड
लोकेशन सहाय्य - आखिल चिंचवडगाव भाजी मंडई
एम के इंटरप्रायजेस
मोरया कुंज
श्री. सोमनाथ निवृत्ती अडागळे
सौ. शैला सोमनाथ अडागळे
धुणसारवन झालया घरी घट घालायचा ठरला
नवरत्नाचा बाजार भरला ग माझ्या बायकोन उपास धरला
( अंबाबाई तू यावं घरला हिन निरंकार उपास धरला )
आधीच अंगान काडीमोडी हात पाय हीच जात्याल गळून
उद्या बसायचं घट म्हणलं की
रातीच ठेवलंय भगरीचे पीठ मळून
केळ रताळ दूध पातळ नातं कसं आलया जुळून
बघ ना कुणाची वाट बया
जावा जावा बसल्या मिळून
धहीताकावरी ताव मारला माझ्या बायकोन उपास धरला
चिलीमिली वेफर्स पापड्या घेतल्या तळून कुरकुरीत
शेंगदाण्याच्या कुटात मिरची टाकून शाबू केलाय चरचरीत
आमटी केली बटाट्याची लईच बरोबरीत
नरड्याला येऊन तोवर खाल्लंय आणि बया झाली गरगरीत
राजगिऱ्याचा नाय लाडू जिरला माझ्या बायकोन उपास धरला
नऊ दिवसाचे नव रतन ऐका त्याची कहाणी
चप्पल ना पायामध्ये बया फिरते अनवाणी
अशक्तपणा आला डॉक्टर आणला कुलदीपानी
सफरचंदाचा ज्यूस पिती मागती नारळ पाणी
साजन उपाय सांगतोय मोरला माझ्या बायकोन उपास धरला