पाकिस्तानमध्ये आल्यापासून प्रचंड खादाडी चालू आहे. जेंव्हा मी लाहोरला आलो तेंव्हा माझे मित्र मैत्रीण अली आणि सवेरा अगदी वाट बघत होते. सवेरा पाशा पाकिस्तानमधील खूप लोकप्रिय खेळ पत्रकार आणि टीव्ही अँकर आहे. आणि तिचा पती अली हा खूप रसिक पत्रकार आहे. खेळाबरोबर त्याने विविध MUSICAL BANDS सोबत भारताचे खूप वेळा दौरे केले आहे. दोघांनी मला हवेली नावाच्या भन्नाट रेस्टोरंन्टला नेले. जेवण तर भन्नाट होतेच पण नजरेपण सुंदर होता. त्याच खादाडीचा हा खास अहवाल.
#SunandanLele #cricket