#BolBhidu #Pandharpur #VitthalMandirMurti
सुमारे ७०० वर्षांपूर्वी जसं होतं, तसं विठ्ठल मंदिर पहायला मिळणार. संत ज्ञानेश्वर आणि संत तुकारामांनी पाहिलं तसं विठ्ठल मंदिर समोर येणार, मागचे काही दिवस या बातम्या सोशल मीडिया आणि माध्यमांमध्ये प्रचंड चर्चेत होत्या. याचं कारण म्हणजे पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराचं सुरु असलेलं संवर्धन आणि जीर्णोद्धाराचं काम. या कामामुळं विठ्ठल मंदिराचं जुनं स्वरुप समोर आलेलं असतानाच, मंदिराच्या हनुमान दरवाजाजवळचा एक दगड खचला, हा दगड खचल्यावर खाली पोकळी असल्याचं जाणवलं आणि शुक्रवारी बातमी आली, पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराच्या आवारात तळघर सापडलं.
नंतर हे तळघर पुरातत्व खात्याच्या अभ्यासकांच्या उपस्थितीत उघडण्यात आलं, ज्यात एकूण चार मुर्त्या, नाणी, काचेच्या आणि मातीच्या बांगड्या, पादुका सापडल्या. त्यानंतर या मुर्त्या विशेषतः दोन मोठ्या मुर्त्या नेमक्या कुणाच्या आहेत ? त्या कधीच्या आहेत ? असे प्रश्न विचारले जाऊ लागले. यात सापडलेली मूर्ती विठ्ठलाची मूळ मूर्ती आहे का ? असाही दावा करण्यात आला. पण या मुर्त्या नेमक्या सापडल्या कशा ? तळघरात काय काय होतं ? या मुर्त्यांबद्दल अभ्यासकांचं काय म्हणणं आहे ? सगळ्याच प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्याचा प्रयत्न या व्हिडीओमधून करुयात.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : https://www.facebook.com/BolBhiduCOM
➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu
➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu.com/
➡️Website: https://bolbhidu.com/