खेकडा पालन शेती/व्यवसाय - Part 2 | Crab Farming Business | Borsut Village | Sangameshwar, Ratnagiri
Contact No. 9324305076
खेकडा पालन शेती माहिती - Part 1
https://www.youtube.com/watch?v=8qWJSExCpTc
खेकड्याला असलेली स्थानिक तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील दिवसेंदिवस वाढती मागणी पाहता नजीकच्या काळात खेकडा शेती व्यवसायाला महाराष्ट्र किनारी महत्व प्राप्त होणार आहे. हा व्यवसाय आपणाकडे अजूनही बाल्यावस्थेत आहे. मच्छीमार सध्या खाडीलगतच्या भागातून खेकडे पकडून त्याची नगण्य दरात विक्री करतात. आंध्र प्रदेश, तामिळनाडू यासारख्या राज्यांनी २० वर्षांपूर्वीच हा व्यवसाय सुरु केलेला आहे. देशामध्ये खेकडा उत्पादनात सर्वात जास्त उत्पादक म्हणून तामिळनाडूचा प्रथम क्रमांक लागतो, त्यापाठोपाठ गुजरात आणि केरळ यांचा क्रम लागतो. त्यामानाने महाराष्ट्राचे उत्पादन फार कमी आहे. खेकडा शेती महाराष्ट्र किनारी विकसित केल्यास नवउद्दोजकांना एक अधिक उत्पन्नाचे साधन मिळू शकणार आहे.