Pradnu आणि Pranju चालले मामाच्या गावाला 😍 | माझी सासुरवाडी साखरी - मंडणगड, रत्नागिरी (Konkan) कोकणामध्ये गावी गेलो की pradnu आणि pranjula घेऊन आम्ही त्यांच्या मामाच्या गावी साखरीला नेतो. मुलांचे मामाचे गाव, माझे सासुरवाडी मंडणगड तालुक्यातील साखरी या गावी आहे. साखरी हे गाव आमच्या आंबवली गावापासून 2 ते 2.5 किमी अंतरावर वसलेलं गाव आहे. बऱ्याच वेळेस आम्ही आमच्या गावावरून चालत प्रवास करत साखरीला जातो परंतु सोबत पोरं बाळं असतील तर गाडी बरी पडते म्हणून आम्ही गाडीने प्रवास केला आहे. पावसाळ्याचे दिवस होते, सायंकाळी आम्ही प्रवास सुरु केला. घरातून आई गाडीपर्यंत सोडायला आली होती. पाऊस पडत असल्यामुळे बाहेरचा नजारा पाहण्यासारखं होता. साखरीला पोहचताच आमचा पाहुणचार सुरू झाला. मेव्हणी तिचे मिस्टर आमचे साळू हे सुद्धा वेळास वरून साखरीला आले होते. आजी सासू यांनी पहिल्यांदाच बाबू प्रदूला पाहिलं होतं. त्या प्रेमाचं विश्लेषण करता येणार नाही. एक रात्र अंक एक दिवस आम्ही साखरी गावामध्ये राहिलो पण ते प्रेम, सुख आम्ही अनुभवलं ते शब्दात सांगता येत नाही. #MamacheGav #SakhariMandangad #SakhariRatnagiri #sforsatish
साखरी गाव हे माझ्या बाबांचे आजोळ त्यामुळे त्या गावात सगळीच घरे नात्यामधली आहेत. सगळ्यांशी जिव्हाळ्याचे संबंध आहेत. एक वेगळाच अनुभव आम्ही साखरीला गेलो की आम्हाला येतो. Sakhari हे गाव अरबी समुद्राच्या किनारी वसलेलं गाव आहे. केळशी या गावचे मुख बाजारपेठ आहे. या गावाला बाजूला वेळास, खारीवाडी अशी गावे आहे. आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो तेव्हा घरातील माणसे आम्हाला सोडायला गाडीपर्यंत आली होती. एक दिवस का असो ना, की घटकाभर कोकणातील माणसांकडून नातेवाईकांकडून जो पाहुणचार होतो तो कुठेच होत नाही. आम्ही दुसऱ्या दिवशी संध्याकाळी आमच्या गावी आंबवलीला पुन्हा आलो. Pradnu आणि pranju दोघांनी मामाच्या गावी खूप मजा केली आणि आम्ही सुद्धा खूप प्रसन्न झालो. तुम्हाला हा मुलांच्या मामाच्या गावचा व्हिडीओ आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका.
तुमचं प्रेम असंच कायम असुद्या !
फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर मला फॉलो करा!
https://www.facebook.com/koknatlamumbaikar
https://www.instagram.com/koknatlamumbaikar